‘या’ 3 सवयींमुळं ऐकू येण्याची क्षमता होऊ शकते कमी, लहान वयातच खराब होतील कान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आपल्या शरीरातील महत्वाचा भाग म्हणजे कान. जर काही काळासाठी तुमचे कान बंद केले तर काय होईल. त्याबाबत तुम्ही विचार सुद्धा करु शकणार नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता वयाच्या ४० ते ५० या वयोगटात कमी झाली तर त्या व्यक्तीस अस्वस्थता वाटणे, चिडचिड होणे अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहित देखील नसेल अशा अनेक चुकीच्या सवयी आहेत. ज्यामुळे तुमच्या श्रवण क्षमतेवर वाईट परिणाम होतो. त्या आज आम्ही तूम्हाला सांगणार आहोत.

१. धूम्रपान

सर्वांना माहिती आहे की सिगारेट ओढल्याने फक्त कॅन्सर चा आजार होतो. मात्र सिगारेटने तुम्ही कर्णबधीर देखील होऊ शकता. सिगारेट ओढण्याचा कानाशी संबंध आहे. सिगारेटमध्ये अनेक विषारी घटक आहेत, जे फुफ्फुसांत जमा होतात. त्याद्वारे रक्तातसुद्धा हे घटक मिसळतात. त्यामुळे शरीरातील संपूर्ण अवयवांना नुकसान पोहचत. कानांचे अंतर्गत अवयव आणि पेशी खूपच नाजूक असतात. विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे कानांची कार्यक्षमता कमी होते. यावरती उपाय म्हणून धूम्रपान न करणं फायदेशीर ठरणार आहे. तसेच दुय्यम दर्जाचे मद्यपान सेवन केल्यास ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

२. तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष

तोंडामधील बॅक्टेरिअल इंन्फेक्शनची समस्या कानांसाठी धोकादायक ठरू शकेल. तोंडातील इंन्फेक्शन कडे सातत्याने दुर्लक्ष करत राहिल्यास हे बॅक्टेरिया रक्तात मिसळतात. हे बॅक्टेरिया धमन्यांच्या सुजेचे कारण ठरु शकतात. कानांच्या पेशी या खूप संवेदनशील असतात. त्यामुळे तोंडातील समस्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांकडे जावा.

३. जास्त आवाजाचं वातावरण

आवाज ऐकण्याची कानाची देखील एक क्षमता असते. कानांच्या पडद्यात व्हायब्रेशन ऐकू येतं. तुम्ही जास्त आवाजाच्या वातावरणात राहत असचाल अथवा जास्त मोठ्याने गाणी ऐकत असचाल तर तुमचे कान लवकरच खराब होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हेडफोन लावून कमी आवाजात गाणी ऐका.