हेल्दी समजले जाणारे ’हे’ 5 पदार्थ, असतात अन’हेल्दी’, जाणून घ्या

काही पदार्थांविषयी आपल्या मनात काही ठाम समज वर्षानुवर्षापासून असतात. विशेष म्हणजे हे समज परंपरागत चालत आलेले असतात. त्यामुळे असे पदार्थ आपण हेल्दी म्हणून निश्चिंतपणे सेवन करत असतो. परंतु तुम्हाला महिती आहे का, असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांना आपण हेल्दी समजतो, ते प्रक्षात आरोग्यसाठी नुकसानकारक असतात. असे कोणते पदार्थ आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत ते पदार्थ

1 फ्लेवर्ड ओटमील
फ्लेवर्ड ओटमील हा असाच एक पदार्थ आहे. यामध्ये ट्रान्सफॅट भरपूर असते. जे गुड कोलेस्ट्रॉल कमी करून हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवते.

2 क्रीम बेस्ड सूप
पॅकेज्ड सूपमध्ये हायड्रोलाइज्ड प्रोटीन, फूड डाय आणि कॉर्स सीरपचे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी नुकसानदायी असते.

3 पॅकेज्ड फ्रूट ज्यूस
पॅकेज्ड फ्रूट ज्यूससुद्धा आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यात भरपूर साखर वापरण्यात आलेली असते. यासाठी फ्रेश ज्यूस किंवा फळे खा.

4 सोया मिल्क
सोया मिल्कचे मर्यादेपेक्षा जास्त सेवन केल्याने शरीरामध्ये अ‍ॅस्ट्रोजन रिसेप्टर अ‍ॅक्टिव्ह होतात. ज्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. हे त्वरित थांबवा.

5 न्यूट्रिशन बार
न्यूट्रिशन बारमधील कॅलरीज, फॅट आणि कार्ब्स बर्न करणे फार अवघड असते. त्यामुळे यांचे सेवन करण्याऐवजी फ्रेश फळांचे सेवन करा.