शरीरावरील स्ट्रेच मार्क्सपासून ‘मुक्ती’ देतील ‘हे’ 6 घरगुती उपाय, करावे लागेल ‘हे’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – प्रेग्नन्सीच्या काळात किंवा त्यानंतर नेहमी महिलांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात. प्रेग्नन्सीच्या दरम्यान शरीराचे वजन वाढते आणि नंतर जेव्हा ते घटू लागते, तेव्हा या कारणामुळे स्कीनवर ताणले गेल्याचे व्रण दिसू लागतात. अशावेळी स्किनवर रेषा पडू लागतात. मात्र, हे व्रण कोणत्याही गंभीर शारीरीक समस्येमुळे होत नाहीत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पण हे अतिशय खराब दिसू लागतात. अनेकदा हे व्रण पोटासह हातावर आणि पायांवर सुद्धा असतात. हे दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या महागड्या क्रिम्स मिळतात. याचा फारसा उपयोग दिसत नाही. पण काही सोपे घरगुती उपाय करून हे स्ट्रेच मार्क्स तुम्ही दूर करू शकता.

हे उपाय लक्षात ठेवा
1 तुम्ही व्हिटॅमिन ई चे बॉडी लोशन वापरून किंवा याचे कॅप्सूल डॉक्टरांच्या सल्ल्याने स्ट्रेच मार्क्सवर लावू शकता. यामुळे ते हळुहळु दूर होतात.

2 स्कीन हायड्रेट राहिल याची काळजी घ्या.

3 दिवसभर भरपूर पाणी प्या. आठ ते ग्लास पाणी प्या.

4 सोबतच पाणीदार फळे आणि भाज्या जसे की काकडी, टरबूज इत्यादी खा.

5 बोल्डस्कायच्या रिपोर्टनुसार लिंबूचा रस स्ट्रेच मार्क्सच्या स्कीनवर लावा. काही मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.

6 एक चमचा बदाम तेलात अन्य तेल मिसळून हे मिश्रण कोमट करा. नंतर हे तेल सुखेपर्यंत गोलाकार हात फिरवत स्ट्रेच मार्क्सच्या स्कीनवर लावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like