पिंपल्ससहित अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरते हळद ! जाणून घ्या हळदीचे विविध फेसपॅक बनवण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकजण चेहऱ्यावरील पिंपल्समुळं परेशान असतात. जर तुम्हाला दीर्घकाळ चेहरा चांगला रहावा असं वाटत असेल तर यासाठी काही घरगुती फेसपॅक वापरून उपाय केले जाऊ शकतात. हे फेसपॅक कसे बनवायचे आणि याचे काय फायदे होतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यात हळदीचा जास्त वापर केला जातो.

1) हळदीत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळं त्वचा थंड पडते. इतकंच नाही तर यामुळं डार्क सर्कल्स दूर होतात. इतकंच नाही तर हळदीत असणाऱ्या अँटीसेप्टीक गुणधर्मामुळं चेहरा आणखी उजळण्यास मदत होते. मुलतानी माती जर हळदी सोबत लावली तर ग्लो वाढतो. हा पॅक बनवण्यासाठी मुलतानी माती, हळद आणि चंदन पावडर दुधात एकत्र करून चेहरा आणि मानेला हे मिश्रण लावावं. नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या.

2) दह्यात रक्षात्मक तत्व आहे जे त्वचेला धूळ आणि मातीपासून संरक्षण देतं. एका भांड्यात अर्धा चमचा हळदी सोबत दही मिसळा आणि फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक लावून 15 ते 20 मिनिटे ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छा पाण्यानं धुवून घ्या.

3) कडूलिंब त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापरामुळं चेहरा फ्रेश आणि चमकदार होतो. कडुलिंबाची 10 ते 12 पानं गरम पाण्यात उकळून घ्या. त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक वाळल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

4) लिंबात नैसर्गिक ब्लिचिंग गुण आहेत. यामुळं त्वचेवरील डाग दूर होण्यास मदत होते. हळद आणि लिंबाच्या मिश्रणामुळं चेहरा उजळ दिसतो आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होते. हळद आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. त्यानंतर एक थेंब गुलाबजल त्यात मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ करून घ्या.

5) मधात मिनरल्स आणि व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असतं. याचा त्वचेला खूप फायदा होतो. त्वचा फ्रेश राहण्यासाठी मधाचा वापर करता येऊ शकतो. त्वचेवरील जखम, व्रण आणि काळे डाग जाण्यासाठी मध उपयोगी ठरतं. एक चमचा मधात हळद मिक्स करा त्यानंतर त्यात अर्धा चमचा कच्चं दूध टाकून चांगलं मिश्रण तयार करून घ्या. आता तयार झालेली ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.