Online Shopping करताना ‘या’ गोष्टी टाळाच; नाहीतर रिकामे होईल Bank Account
नवी दिल्ली : सध्या ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढली आहे. बहुतांशजण ऑनलाईन शॉपिंग करून बाहेर जाणे टाळतात. पण ही शॉपिंग करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही अधिकृत अशा वेबसाईटवरूनच ऑनलाईन शॉपिंग केल्यास सुरक्षित राहण्याची शक्यता असते.
ऑनलाईन शॉपिंग करताना हे आवश्य करा…
Cash on Delivery पर्याय
ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकवेळा Cash on Delivery हा पर्याय दिला जातो. त्यामुळे तुम्ही कोणतीही शॉपिंग करताना या पर्यायाचा वापर करावा. याने बँक खात्याची माहिती द्यावी लागत नाही. तुम्हाला रोखीने अशा वस्तू खरेदी करता येऊ शकतात.
बनावट वेबसाईट्सपासून सतर्क राहा
बनावट वेबसाईट्स आणि अॅप्स तयार करून हॅकर्सकडून फसवणूक केली जाते. त्यामुळे कोणत्याही वेबसाईट किंवा अॅपवरून खरेदी करण्यापूर्वी ती वेबसाईट चेक करा. फक्त अधिकृत आणि विश्वसनीय वेबसाईटच्या माध्यमातूनच खरेदी करा. तसेच ऑनलाईन खरेदी करताना आपण ज्या वेबसाइटवरून खरेदी करणार आहात त्याची URL तपासा. वेबसाइटची URL HTTPS ने सुरू व्हायला हवी. पण HTTP नाही. HTTPS मधील ‘S’ हा साईट Google ने साईट Secure केली असल्याचे सागते.
Common Wifi चा वापर टाळा
खरेदी करताना Public Wifi चा वापर टाळावा. त्याऐवजी स्वत:चा Wifi वापरावा. बर्याचवेळा लोक सायबर कॅफे किंवा रेस्टॉरंट्ससारख्या सार्वजनिक ठिकाणी असताना Public Wifi च्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी करतात. त्यामुळे तुमचे अकाउंट हॅक केले जाण्याची दाट शक्यता असते.
कधीही सेव्ह करू नका कार्ड डिटेल्स…
ऑनलाईन खरेदी करताना तुमच्या एटीएम कार्डच्या डिटेल्स कधीही सेव्ह करू नका. बर्याचदा एखाद्या साईटवर कार्डची माहिती भरताना Save Card Details चा पर्याय येतो आणि त्यावर Yes टिकमार्क येतो. बऱ्याचवेळा त्यावर क्लिक होते. हा पर्याय काळजीपूर्वक पाहून त्यावरचा No ऑप्शन निवडावा.