लहान मुलं नीट जेवत का नाहीत ? ‘ही’ त्यामागील कारणं ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – प्रत्येक पालक आपल्या घरातील लहान मुलांबद्दल एक तक्रार कायम करत असतात, ती म्हणजे लहान मुलं नीट जेवण करत नाहीत. कारण याचा परिणाम त्या मुलांच्या आोरग्यावरही होत असतो. वजन कमी होणं, अशक्तपणा येणं, हे त्रास त्यांच्याक हमखास दिसतात. परंतु मुलं अशी का करतात हे पालकांना काही केल्या कळत नाही. आज आपण यामागील कारणं जाणून घेणार आहोत.

मुलांना भूक न लागण्याची कारणं पुढीलप्रमाणे –
1) कौटुंबिक समस्या किंवा अभ्यासाचा ताण.

2) लहान मुलांना देखील नैराश्य येतं आणि त्यामुळं त्यांचीही भूक मंदावते.

3) ॲनोरेक्सिया नर्व्होसा म्हणजेच मनापासून जेवण न करावंस वाटणं.

4) ॲनिमिया असलेली मुलं आळशी, थकलेली आणि चिडचिडी असतात. त्यामुळं जेवताना ते कंटाळा करतात.

5) पोटात कृमी किंवा जंत झाल्यास मुलांची भूक कमी होणं, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव, अतिसार अशा समस्या उद्भवू शकतात.

6) कोठा नियमित साफ न झाल्यास मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.