Nokia च्या स्मार्टफोनमध्ये नवीन ‘फीचर’, नेटवर्क शिवाय करा ‘कॉल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : डिसेंबर २०१९ मध्ये टेलिकॉम कंपनी एअरटेल कडून आपली वाय फाय कॉलिंग सेवा लाँच करण्यात आली होती. एअरटेल ने ही सुविधा चालू केल्यानंतर रिलायन्स जिओने देखील ही सेवा जानेवारी २०२० मध्ये लाँच केली होती. सध्या एअरटेल आणि जिओ २२ टेलिकॉम सर्कल ही सेवा देखील देत आहेत.

विशेष म्हणजे ही ऑफर सर्व प्रकारच्या ब्रॉडबँड सर्विससोबत काम करते. दरम्यान नोकियाचा स्मार्टफोन बनवणाऱ्या HMD Global ने आपल्या त्या नोकिया स्मार्टफोन्सची यादी जाहीर केली असून यादीमधील सर्व स्मार्टफोन हे वाय फाय कॉलिंग सर्विसला सपोर्ट करतात. नोकियाच्या ९ स्मार्टफोनमध्ये जिओची वायफाय कॉलिंग सेवा सपोर्ट करते तर नोकियाच्या ७ स्मार्टफोनमध्ये एअरटेलची वायफाय कॉलिंग सेवा सपोर्ट करते. यासाठी कंपनीने नेटवर्क अपडेट रोल आउट केले आहे.

या नोकिया स्मार्टफोनला मिळणार वायफाय कॉलिंग सेवा

नोकियाच्या जवळपास ९ स्मार्टफोनला जिओ वायफाय कॉलिंगचा सपोर्ट मिळणार आहे. ते कोणकोणते स्मार्टफोन आहेत ते जाणून घेऊया यामध्ये नोकिया ९ प्योरव्यू, नोकिया ८.१, नोकिया ८ सिरोको, नोकिया ७.२, नोकिया ७.१, नोकिया ७ प्लस, नोकिया ६.२, नोकिया ६.१ प्लस आणि नोकिया ६.१ या स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे.

आता ग्राहक व्हाईस ओव्हर वाय फाय कॉलिंगच्या मदतीने कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपशिवाय मोबाइलवरून वायफाय नेटवर्कवर कॉलिंग करू शकणार आहेत. जर फीचरचा वप्त करत असताना जर ग्राहकाला वायफायची मदत घेऊन कॉलिंग करायची असेल तर त्याला स्मार्टफोनमध्ये WiFi आणि VoLTE हा पर्याय चालू ठेवावा लागणार आहे. २०२० मध्ये ही सेवा रिलायन्स जिओने लाँच केली होती.