‘या’ लोकांना हृदयरोगाचा जास्तच धोका, ‘या’ पध्दतीनं करा स्वतःचं संरक्षण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : असे म्हंटले जाते कि, लठ्ठपणा हा रोगांचे घर आहे, परंतु प्रत्येक प्रकारचा लठ्ठपणा रोगांचे घर नसतो. कारण लठ्ठपणाचीही एक कॅटेगरी आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे सत्य आहे. जे पूर्णपणे लठ्ठ आहेत त्यांच्या तुलनेत, हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका फक्त पोटाने लठ्ठ असणाऱ्यांना जास्त असतो. जर या लोकांना हृदयरोगासह इतर आजार टाळायचे असतील तर त्यांना त्यांच्या पोटावर साचलेली चरबी कमी करावी लागेल. पोटावर साठलेली चरबी कमी करण्यासाठी असेही करू नका कि आपण खाणे पिणे सोडून द्याल. यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत काही बदल करून वाढणारे पोट कमी करू शकता.

यासंदर्भात तज्ज्ञांचे मत
माहितीनुसार, काही काळापूर्वी अमेरिकास्थित मेयो क्लिनिकने केलेल्या संशोधनानुसार, ज्या लोकांचे शरीर बीएमआय (बॉडीमास इंडेक्स) पॅरामीटरवर फॅटी असते परंतु त्यांच्या पोटावर चरबी नसते, त्यांचा लठ्ठपणा जास्त हानिकारक नसतो. परंतु ज्या लोकांच्या पोटावर फॅट जास्त असते त्यांना रोगाचा धोका जास्त असतो.

हृदयरोगाचा धोका जास्त
मेयो क्लिनिकमध्ये झालेल्या या संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, ज्या लोकांच्या पोटावर जास्त चरबी असते त्यांना दुसऱ्यांच्या तुलनेत हृदयाशी संबंधित आजार जसे कि, ह्रदयाचा झटका, कार्डिएक अरेस्ट, बीपी, हायपर टेन्शन आणि मधुमेह यासारख्या हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका जास्त असतो. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की आपल्या पोटावर साचलेली चरबी हे दर्शवते की आपली जीवनशैली खूप आळशी आहे. याचा अर्थ असा की आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाही किंवा आपल्या शरीराच्या गरजेनुसार शारीरिक क्रिया करीत नाही.

चरबी कमी करण्यासाठी करा हे काम
कोरोना कालावधीमध्ये जिममध्ये जाणे आणि बागेत फिरणे शक्य नाही. म्हणून आपण घरी काही सोपे उपाय केले तर चांगले होईल. यासह, आपण बाहेर न जाता तंदुरुस्ती राखण्यास सक्षम असाल.यासाठी, आपण दररोज खाल्ल्यानंतर किमान 20 मिनिटे वज्रसन मध्ये बसावे. हे आपल्या पचनसंस्थेस अन्न पचन करणे सोपे करेल. खास गोष्ट अशी आहे की वज्रासन आपल्या पोटावर चरबी जमा होण्यासही प्रतिबंधित करते.