हे लोक मोदी विरोध करत देशाचा विरोध करत चालले आहेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सुरु असणाऱ्या राजकीय स्थितीला डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये विरोधकांवर निशाणा साधला आहे. आपल्या देशात काही पक्षाचे लोक मोदींचा विरोध करत करत देशाचा विरोध करत चालले आहेत असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींनी हवाई हल्ल्याचा पुरावा मागणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर नाव नघेता निशाणा साधला आहे.

आपल्या देशात विरोधी पक्षातील काही नेत्यांनी विरोध करण्याची परिसीमा गाठली आहे. त्यांनी मोदींचा विरोध करत करत देशाचा विरोध करायला सुरुवात केली आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पाकिस्तान सारख्या देशात भारतातील विरोधी पक्षांचे नेते जे बोलतात त्या वक्तव्यांचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ लागला आहे. याची तरी जाणीव विरोधकांनी ठेवायला हवी. मोदींवर किती टीका करायची तेवढी करा मात्र देशावर आणि देशाच्या सैनिकानावर तुम्ही टीका करू नका. कारण मोदी सारखे अनेक लोक सत्तेवर येणार आणि जाणार आहेत. परंतु हा भारत अमर राहणार आहे असे राष्ट्रभक्तीपर उद्गार नरेंद्र मोदी यांनी देशातील स्थिती बद्दल काढले आहेत.

लोकांना आज सरकारची भीती वाटत आहे. दहशतवाद्यांना भारतीय लष्कराची भीती वाटत आहे. भ्रष्टाचाराच्या मसीहाला कार्यवाहीची भीती वाटू लागली आहे हे देशात स्वच्छ कारभाराचे लक्षण आहे असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. एका राष्ट्रीय वृत्त वाहिनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते त्या ठिकाणी ते बोलत होते.