Birthday SPL : 30 ची झाली राशी खन्ना ! व्हायरल होताहेत Bold अवतारातील खास फोटो

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सिनेमातील फेमस अ‍ॅक्ट्रेस राशी खन्ना (Rashi Khanna) आज (सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2020) तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. राशीचा जन्म 30 नोव्हेंबर 1990 रोजी दिल्लीत झाला होता. राशी अ‍ॅक्टिंग आणि लुकमुळं सोशलवरही खूप फेमस आहे. तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. राशी सोशलवर कायमच सक्रिय असते. राशी अनेकदा चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. आपल्या हॉट लुकमुळं ती अनेकदा चर्चेत आली आहे.

राशीनं तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. या ग्लॅमरस फोटोत तिचा बोल्ड अँड हॉट अवतार दिसत आहे. सध्या तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत.

चाहत्यांनाही राशीचा बोल्डनेस खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत, तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

आज वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राशीही चाहत्यांचं प्रेम पाहून खूप खूश झाली आहे.

राशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती तिचा आगामी सिनेमा अरान्मनई 3 (Aranmanai 3) मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 2013 साली राशीनं मद्रास कॅफे सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमात तिची प्रमुख भूमिका होती. तिनं एकच हिंदी सिनेमा केला आहे. 2014 मध्ये राशीनं जोरू या सिनेमातून साऊथ सिनेमात खूप लोकप्रियता मिळवली होती. आज ती साऊथमधील फेमस अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे.

You might also like