‘हे’ उपाय करून करा चामखीळ दूर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या शरीरावर काही वेळा चामखीळ येतात. हे नको असलेले चामखीळ शरीरातील त्वचेची छिद्र प्रसरण पात नसून जवळ येतात. त्यावेळी त्वचेस शुद्ध वायू मिळत नसल्याने चामखीळ बनतात. त्याव्यतिरिक्त पापिलोमा विषाणूंमुळे पण चामखीळ होतात. कधी कधी हे तीळ आणि चामखीळ आनुवंशिक असतात तर कधी शरीरातील बदलणाऱ्या हार्मोन्स मुळे पण आढळतात. त्वचेवर लटकत असलेले काळ्या ब्राऊन रंगाचे डाग त्वचेचे सौंदर्य कमी करु शकतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टींचा वापर करुन चामखीळीपासून कशी सुटका मिळवता येईल याबद्दल सांगणार आहोत.

१. केळाच्या सालीचा वापर
चामखीळीपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम केळाची साल घ्या. त्वचेवर चामखीळ असलेल्या ठिकाणी केळ्याची साल लावा आणि एका कापडाने बांधून ठेवा. मग कापसाचा वापर करुन तेलाने मसाज करा. सातत्याने हा प्रयोग केल्यास त्वचेवर लटकत असलेले डाग निघून जातील.

२. सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदाच्या व्हिनेगरचे काही थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन तो कापूस त्वचेला लटकत असलेल्या पुळ्यांना लावा. थोडा वेळ ठेवल्यानंतर तो भाग धुवून टाका. हा प्रयोग केल्यास काही दिवसातच त्वचेवर लटकत असलेलं डाग निघून जातील.

३. व्हिटॅमिन ई
त्वचेवर असलेल्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ई हा उपाय ठरु शकतो. त्यासाठी व्हिटॅमिन ई चे तेल चामखीळीला लावा. लवकरात लवकर त्वचेला लटकत असलेल्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॅमिन ई असलेल्या तेलाचा वापर त्वचेवर करा.

४. लसूण
लसणाच्या वापराने तुम्ही त्वचेवरील टॅग काढू शकता. यासाठी लसूण सोलून त्याची पेस्ट करुन चामखीळ असलेल्या भागांवर लावा. रात्रभर ते तसेच ठेवा. सकाळी कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.

५. लिंबाचा रस
लिंबाचा रस मोसच्या जागेवर लावल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. कापसाने लिंबाचा रस मोसवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या. काही वेळानंतर त्याभागावरील त्वचा धुवून टाका.

६. बेकिंग सोडा
चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा मोसवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा एरंडीच्या तेलात मिक्स करुन पेस्ट तयार करा आणि मोसवर ही पेस्ट लावा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसेल.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.)