सौंदर्य खुलवण्यासाठी फेशिअल मसाजच्या 5 सोप्या टीप्स ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आज आपण चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी काही टीप्स जाणून घेणार आहोत. या टीप्स खूप सोप्या आहेत.

1) चेहऱ्यावर करा मसाज – यामुळं त्वचेचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं. ज्या उप्तादनाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर मसाज करता ते पदार्थही तुमच्या त्वचेत मुरतात आणि याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो.

2) तेलाची मसाज – चेहऱ्यासाठी असणाऱ्या तेलाचा मसाजसाठीही वापर करू शकता. त्वचेचे पोर्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. यावेळी तुमचे हात नीट स्वच्छ केलेले असावेत.

3) अॅक्युप्रेशर पॉईंट्स ओळखून मसाज – आपल्या चेहऱ्यावर काही अॅक्युप्रेशर पॉईंट्स असतात. हे पॉईंट्स ओळखून 3 मिनिटांपर्यंत मसाज करा. ज्या पॉईंट्सवरून मसाज केल्यानं आराम मिळत असेल त्यावर भर द्या. यामुळं चेहऱ्याला आराम मिळेल आणि ब्लड सर्क्युलेशनही योग्य पद्धतीनं होईल.

4) मानेवर तेलाची मसाज – जर तुम्हाला कायम डोळ्यावर सूज येत असेल तर मानेवर तेलानं मसाज करा. डोळ्यांमधून पाणी येत असेल तर ही समस्यादेखील दूर होईल.

5) भुवयांची मसाज – अनेकांना सायनस किंवा चेहऱ्याच्या वेदनांची समस्या असते. कधी कधी नाकानं श्वास घेण्यासही त्रास होतो. सर्व उपाय करूनही वेदना ठिक होत नसतील तर भुवयांची 30 सेकंद मसाज करा. वेदना दूर होण्यास मदत होईल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.