1 ऑक्टोबरपासून बदलणार Tax संबंधित ‘हे’ नियम, सर्व करदात्यांनी जाणून घेणं महत्वाचं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – जर तुम्ही पगारदार वर्गातून येत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर टॅक्सशी संबंधित झालेल्या बदलाचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. प्रत्यक्ष टॅक्स आणि अप्रत्यक्ष टॅक्स संबंधित नियमांमध्ये झालेल्या बदलावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. 1 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपासून प्रत्यक्ष टॅक्स आणि अप्रत्यक्ष टॅक्सशी संबंधित नियमांमध्ये असेच काही बदल होणार आहेत. हे बदल आपल्या खर्च करण्याच्या पद्धती, व्यवहार आणि निधीच्या प्रवाहावर महत्त्वपूर्ण परिणाम दर्शवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की, गुरुवारपासून टॅक्स संबंधित नियमांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल होणार आहे.

टेलिव्हिजनच्या कम्पोनेंटवर पाच टक्के आयात शुल्क
1 ऑक्टोबरपासून सरकार टेलिव्हिजनशी संबंधित एका प्रमुख कम्पोनेंटवर पाच टक्के आयात शुल्क लावणार आहे. सरकारने एक वर्षासाठी हा दिलासा दिला होता. कमी खर्चात होणारी आयात कमी करणे आणि आयात शुल्क वाढवून स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे.

परदेशात पैसे पाठविण्यासाठी पाच टक्के टीसीएस आकारला जाईल
काही प्रकरणे वगळता, सरकार भारताबाहेर पैसे पाठविण्यावर टीसीएस पाच टक्के घेईल. हा टॅक्स परदेश दौरा पॅकेजेस खरेदी करण्यासाठी परदेशात पाठविलेल्या कोणत्याही रकमेवर हे टॅक्स देय असेल. तथापि, उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊन पैसे हस्तांतरित करण्यासाठी टीसीएस 0.5 टक्के दराने देय असेल.

E-Commerce वर TDS
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आता विक्रेत्यांना झालेल्या पेमेंटवर एक टक्के दराने टीडीएस कपात करावी लागेल. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वस्तू विक्री करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना टॅक्सच्या जागेखाली आणण्याचे उद्दीष्ट आहे. पेमेंटच्या वेळी ई-कॉमर्स कंपन्यांना स्त्रोतवर टॅक्स कमी करावा लागतो.

1 ऑक्टोबरपासून 500 कोटींपेक्षा अधिक व्यवसायांसाठी e-Invoicing अनिवार्य करण्यात आले आहे. जीएसटीएनने ठरविलेल्या पोर्टलवर व्यापाऱ्यांना विक्रीची स्लिप अपलोड करावी लागेल.