1 डिसेंबरपासून ‘या’ 4 गोष्टी बदलणार, सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेशी आधार जोडण्याची आज शेवटची तारीख – मोदी सरकारने ‘पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजने’चा हप्ता मिळण्यासाठी आधार क्रमांक लिंक करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी सरकारने अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 ची तारीख निश्चित केली आहे. तर जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना ही मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवून दिली आहे. जर आधार क्रमांक लिंक करण्यास उशीर झाला तर त्या शेतकऱ्यांना 6000 रुपये शेतीसाठी मदत मिळणार नाही.

मोबाइल कॉल महाग होणार

अ‍ॅडजस्टर्ड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) बाबतीत टेलिकॉम कंपन्या कर्जाच्या दबावाखाली आहेत. याचा सामना करण्यासाठी कंपन्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवून ग्राहकांच्या खिशावर भार टाकू शकतात. 1 डिसेंबरपासून व्होडाफोन, आयडिया, एअरटेलसह सर्व दूरसंचार कंपन्या कॉल आणि इंटरनेट सेवा महाग करू शकतात.

जीवन विमा नियम बदलणार

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) 1 डिसेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल करणार आहे. त्यानुसार प्रीमियम काहीस महाग होऊ शकतो आणि हमी परतावाही कमी असू शकतो.

LIC च्या योजना आणि प्रस्ताव फॉर्ममध्ये बदल

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय जीवन विमा महामंडळ 1 डिसेंबरपासून आपली योजना व प्रस्ताव फॉर्म बदलणार आहे. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे नवीन प्रस्ताव फॉर्म पूर्वीपेक्षा जास्त लांब आणि विस्तृत असतील.

Visit : Policenama.com