पुढच्या आठवड्यापासून बदलणार आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित ‘या’ गोष्टी, थेट तुमच्यावर खिशावर होईल ‘परिमाण’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पुढच्या आठवड्यात म्हणजेच 11 मे नंतर तुमच्या जीवनात बरेच मोठे बदल घडून येणार आहेत. यात एसबीआय, गोल्ड बाँड योजना, जनधन खात्यांशी संबंधित अनेक गोष्टींचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. जाणून घेऊया या बदलांविषयी. ..

एसबीआयने एफडी दर केला कमी
देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) देखील मुदत ठेवींवरील (एफडी) व्याज कमी केले आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर एसबीआयचे नवीन दर 12 मे 2020 पासून लागू होतील. एसबीआयने तीन वर्षांच्या एफडीवरील व्याज दर कमी करून 0.20 टक्के केले आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँकेने एक निवेदन जारी करत म्हटले की, प्रणाली आणि बँकेची तरलता लक्षात घेऊन आम्ही 3 वर्षांच्या कालावधीपर्यंत किरकोळ मुदत ठेवींच्या दरात ही कपात करीत आहोत. एसबीआय एफडी दर जे 12 मे पासून सामान्य लोकांना लागू होतील. आता आपल्याला 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.3 टक्के व्याज मिळेल, 46 ते 179 दिवस – 4.3%, 180 ते 210 दिवस – 4.8%, 211 दिवस ते 1 वर्ष – 4.8%, 1 ते 2 वर्षे – 5.5%, 2 ते 3 वर्षांपर्यंत – 5.5%, 3 ते 5 वर्षांपर्यंत – 5.7% व्याज मिळेल.

स्वस्त किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी
सोन्याच्या वाढत्या किंमतींदरम्यान मोदी सरकारने स्वस्त सोन्याची नवीन योजना आणली आहे. सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड 2020-21 योजनेचा पुढील टप्पा 4,590 रूपये प्रति ग्रॅम निश्चित केला आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2020- 21 च्या सीरीज-2 सब्सक्रिप्शनसाठी 11 मे 2020 ते 15 मे 2020 या कालावधीत खूूूली राहिल. सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती आर्थिक वर्षात 500 ग्रॅम पर्यंत सोन्याचे बॉण्ड खरेदी करू शकते. त्याच वेळी, किमान गुंतवणूक एक ग्रॅम आहे. आपण या योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता. या योजनेंतर्गत गुंतवणूकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळेल.

8 किंवा 9 अंकी जन धन खातेधारक दुसर्‍या हप्त्याची रक्कम काढू शकतील
लॉकडाऊनच्या दरम्यान गरिबांना रेशन आणि आर्थिक मदत देण्याची योजना सुरू आहे. पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत महिला खातेदारांच्या खात्यात सरकारने 500 रुपयांचा आणखी एक हप्ता टाकण्यास सुरूवात केली आहे. या महिन्यात आतापर्यंत 10 कोटीहून अधिक जनधन महिला खातेदारांच्या खात्यात आणखी एक हप्ता जोडला गेला आहे. 4.मेपासून हे पैसे काढण्याची सुविधादेखील खाते क्रमांकानुसार देण्यात आली. 11 मे पर्यंत शेवटचा नंबर 8 किंवा 9 अंक असणारे खातेदार आपले पैसे काढू शकतात.