टीम इंडियाने ‘ड्रॉप’ केलेल्या ‘या’ ३ टॉपच्या खेळाडूंना पुन्हा भारतीय जर्सी घालण्याची संधी मिळणार का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. या विंडीज दौऱ्यात भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. तीनही प्रकारांमध्ये निवड समितीने रिषभ पंत याची यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती पंतला या स्थानासाठी तयार करत आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंमध्ये निवड युवा आणि नवीन खेळाडूंना संधी दिली आहे.

संघ निवड करताना निवड समितीने अनेक मोठ्या नावांचा विचार न करता युवा खेळाडूंना संधी दिली आहे. कारण भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक युवा खेळाडू आहेत ज्यांचा समावेश भारतीय संघात लवकरच केला जाऊ शकतो. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, अभिमन्यु ईश्वरन आणि श्रीकर भरत यांसारखे अनेक खेळाडू भारतीय संघात प्रवेश करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात निवड न झालेले तीन असे खेळाडू आहेत ज्यांची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. यानंतर त्यांना भारतीय संघात खेळण्याची संधी जवळपास शून्य आहे. यामध्ये पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक या दोन यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश असून तिसरा खेळाडू सलामीवीर फलंदाज मुरली विजय आहे. या तीन खेळाडूंचे वय आणि कामगिरी पाहता या खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात प्रवेश मिळणार नाही हे नक्की आहे.

१) दिनेश कार्तिक

एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला निवड समितीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकप संघात त्याचा समावेश होता. मात्र विंडीज दौऱ्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले आहे. वर्ल्डकपमध्ये त्याला विशेष कामगिरी करता आली नाही.

ु

३ सामन्यांत त्याला केवळ १४ धावा बनवता आल्या. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ९४ एकदिवसीय सामने खेळले असून यामध्ये १७५२ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता भविष्यात दिनेश कार्तिकला संधी मिळण्याची शक्यता नसल्याने त्याचे करियर जवळपास संपुष्टात आले आहे.

२) पार्थिव पटेल

भारतीय कसोटी संघात आत बाहेर होणाऱ्या या खेळाडूला विंडीज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेलं नाही. तो शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी २५ कसोटी सामने खेळले असून यामध्ये केवळ ९३४ धावा केल्या आहेत.

ु

यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे आता पुन्हा भारतीय संघात त्याची निवड होणे अशक्य आहे. त्यामुळे त्याचे देखील करियर जवळपास संपुष्टात आले आहे.

३) मुरली विजय

सलामी फलंदाज मुरली विजय याची विंडीज दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेली नाही. मागील मोसमात इंग्लंडविरुद्ध त्याची कामगिरी विशेष झाली नव्हती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आलेला आहे.

ु

मुरली विजयने भारतीय संघासाठी अद्यापपर्यंत ६१ कसोटी सामने खेळले असून या सामन्यांत त्याने ३९८२ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात तो खेळत होता तरी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात मात्र त्याला भारताकडून जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. पृथ्वी शॉ सारख्या नवख्या फलंदाजाने चाफळी कामगिरी केल्याने आता त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

आरोग्यविषयक वृत्त –