दुसर्‍यांदा आई-बाबा व्हायचंय का ? ‘या’ 5 गोष्टींकडे द्या आवर्जून लक्ष, नाहीतर होईल पश्चाताप !

पोलिसनामा ऑनलाईन – करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी दुसर्‍यांदा आई बाबा होण्याचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. तुम्हाला सुद्धा आई-बाबत व्हायचे असेल तर काही गोष्टींचा विचार जरूर केला पाहिजे कारण चुकीचा निर्णय घेतल्यास तुमच्या आणि येणार्‍या बाळाच्या जीवनावर याचा परिणाम होऊ शकतो. लोक सुज्ञ आहेतच, तरी सुद्धा असे काही घटक आहेत ज्याबद्दल प्रत्येक दाम्पत्याने पुन्हा आई बाबा होताना विचार केला पाहिजे. हे घटक कोणते ते जाणून घेवूयात…

1 पहिल्या बाळाचे वय
दोन मुलांच्या मध्ये पुरेसे अंतर हवे. दोन्ही मुलांच्या वयात अंतर असल्याने दोघांच्या गरजा बदलतात. मोठं मुल आपल्या भाऊ किंवा बहिणीची काळजी घेऊ शकते. भविष्यात दोघांच्या खर्चाचे ओझे सुद्धा एकत्र अंगावर येत नाही.

2 दोन डिलिव्हरीमधील अंतर
दोन मुलांमध्ये व दोन डिलिव्हरींमध्ये किमान 18 महिन्याचे अंतर असावे. दीड वर्षे किंवा त्या नंतरचा काळ लोटल्यावर दुसर्‍या मुलाचा विचार करा.

3 आर्थिकदृष्ट्या सक्षम
कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम असणे आवश्यक आहे. अतिश्रीमंतांना हा घटक महत्वाचा नसला तरी सामान्य आई वडीलींनी याचा विचार केला पाहिजे. आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन्ही बाळांचे संगोपन चांगले करता येईल.

4 आरोग्याची काळजी
आरोग्याची काळजी हा महत्वाचा घटक आहे. डिलिव्हरी, गरोदरपणा स्त्री साठी एक त्रासदायक प्रक्रिया असते. या काळात शरीरावर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण होतो. यासाठी दोन डिलिव्हरी मध्ये अंतर राखणे गरजेचे असते. पहिल्या डिलिव्हरीत समस्या आल्या असतीत तर दुसर्‍या डिलिव्हरीपर्यंत पुरेसे अंतर ठेवावे.

5 मुलांना वेळ देणे
महिलांसाठी हा पाचवा घटक महत्वाचा आहे. पहिल्या मुलासाठीच जर तुमच्याकडे वेळ कमी पडत असेल तर दुसर्‍या गरोदरपणाचा निर्णय टाळणे योग्य ठरू शकते. दोन मुलांचे संगोपन योग्य प्रकारे झाले नाही तर त्याचा मोठा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो.