Homeआरोग्यThese Types Of Juices Can Stop Increasing Age | वाढत्या वयाला ब्रेक...

These Types Of Juices Can Stop Increasing Age | वाढत्या वयाला ब्रेक लावू शकतात ‘हे’ 5 प्रकारचे ज्यूस, नेहमी दिसाल तरुण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – These Types Of Juices Can Stop Increasing Age | ताज्या फळांचा रस प्यायल्याने आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात. हे केवळ चवीसाठी नव्हे तर शरीरासाठी फायदेशीर आहेत. काही खास फळांचा ज्यूस वेगाने वाढणार्‍या वयालाही ब्रेक लावू शकतो. रोजच्या आहारात त्यांचे सेवन केल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसाल (These Types Of Juices Can Stop Increasing Age).

 

1. डाळिंबाचा ज्यूस (Pomegranate Juice) –
पॉलिफेनॉलसारखे अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट डाळिंबाच्या ज्यूसमध्ये आढळतात. सूज, कर्करोग आणि रक्तदाब यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी ते प्रभावी आहे. डाळिंबाचा परिणाम शरीरातील वृद्धत्वाच्या पेशींवरही होतो.

 

वयाच्या पन्नाशीनंतर, आपल्या पेशी मायटोकॉन्ड्रियाच्या रिसायकलिंगसोबत संघर्ष करू लागतात, ज्याचा थेट परिणाम स्नायूंवर होतो. जेव्हा शरीरात अशी समस्या उद्भवते तेव्हा पार्किन्सन रोगाचा धोका देखील वाढतो. डाळिंबातील युरोलिथिन नावाचा घटक तुमची माइटोकॉन्ड्रियल प्रक्रिया निरोगी ठेवण्याचे काम करतो.

 

2. गाजर ज्यूस (Carrot Juice) –
गाजरात आढळणारे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यामध्ये असलेले ल्युटीन डोळे आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप चांगले मानले जाते. गाजरात बीटा कॅरोटीन नावाचे पोषक तत्व देखील असते.

 

हे एक अँटिऑक्सिडंट आहे ज्यास तुमचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. कॅन्सर एपिडेमियोलॉजी, बायोमार्कर्स अँड प्रिव्हेंशनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, बीटा कॅरोटीनमुळे तरुणांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोकाही कमी होतो. (These Types Of Juices Can Stop Increasing Age)

3. बीट ज्यूस (Beet Juice) –
काहींना बीट ज्यूस आवडतो, पण काहीजण त्यापासून दूर पळतात. कदाचित तुम्हाला माहित नसेल की बीट ज्यूस आपल्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्याचे काम करतो. रेडॉक्स बायोलॉजीच्या अभ्यासानुसार, बीट ज्यूसमध्ये आढळणारे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बीट ज्यूस प्यायल्यानंतर लोकांच्या रक्तदाब पातळीत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.

 

4. पिंक ग्रेपफ्रुट ज्यूस (Pink Grapefruit Juice) –
कॅरोटीनोइड्स हे संयुग आहे जे फळे आणि भाज्यांना त्यांचा नैसर्गिक रंग देते. कॅरोटीनोइड्स वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्याचे काम करते.
पिंक ग्रेपफ्रुटमध्ये लाइकोपीन नावाचे कॅरोटीनॉइड देखील असते. लाइकोपीन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.

 

एका अभ्यासात याचा त्वचेवरही परिणाम दिसून आला आहे. अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार,
लाइकोपीन शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते, ज्याचा थेट आपल्या हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो.

 

5. व्हीटग्रास ज्यूस (Wheatgrass Juice) –
व्हीटग्रास ज्यूस चवीला फारसा चांगला नसतो. परंतु शरीराला त्याचे होणारे फायदे आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्मांबद्दल जाणून घेतल्यास,
तुम्ही त्याचा आहारात नक्कीच समावेश कराल. त्यात भरपूर क्लोरोफिल असते जे अनेक वनस्पतींना हिरवा रंग देण्याचे काम करते.

 

यात अँटी-इनफ्लेमेटरी गुणधर्म (Anti-Inflammatory Properties) देखील आहे ज्यामुळे प्रौढांमधील आजारांचा धोका कमी होतो आणि त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारते.

 

Web Title :- These Types Of Juices Can Stop Increasing Age | 5 best juices to slow aging says science

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anna Hazare | अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे हताश उद्गार

 

Low Blood Sugar | लो ब्लड शुगर सुद्धा आहे शरीरासाठी धोकादायक ! एक्सपर्टकडून जाणून घ्या लक्षणं, कारणं आणि उपचार

 

Pune Crime | पुण्यात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार ! पुणे पोलिसांकडून 6 जणांना अटक, 97 लाखांचा 800 क्विंटल तांदूळ जप्त

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News