सावधान ! कोबीमधील ‘हा’ सूक्ष्म जीव मेंदूसाठी घातक ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्य चांगले रहावे यासाठी पालेभाज्या, फळभाज्या खाणे चांगले असते. डॉक्टरदेखील नेहमी अशाप्रकारचा सल्ला देतात. परंतु, भाज्या चूकीच्या पद्धतीने खाल्ल्यास किती त्रासदायक ठरू शकतात, हे आपण पाहणार आहोत. कोबीची भाजी ही आरोग्यासाठी खूप उपयूक्त आहे. मात्र, कोबी चूकीच्या पद्धतीने अथवा निष्काळजीपणे खाल्ला तर त्याचे परिणाम किती भयंकर होतात, हे आपण पाहणार आहोत.

कच्च्या फळभाज्या खाल्ल्याने टॅपवार्म संक्रमण होण्याची भिती असते. कोबी, पत्ताकोबीमध्ये असणारी एक अळी आपल्या डोळांनी दिसत नाही. कारण ती अळी फुलगोबीच्या मधल्या भागात लपलेली असते. ही अळी उच्च तापमानातही जिवंत राहते. कारण या अळीचे अंड कठोर आवरणात असते. ही अळी आरोग्यासाठी खुप घातक असते. कारण ही अळी रक्तप्रवाहाच्या माध्यमातून मेंदूमध्ये प्रवेश करते. यास Taeni solium असे म्हणतात.

कोबी, फूलकोभी, पत्ता कोबी, ब्रोकली यांसारख्या फळभाज्यांमध्ये ही आळी आढळते. ही अळी एका रिबन प्रमाणे असते आणि आपल्या आतड्यांना चिटकते. आतड्यांमध्येच अळी आपली अंडी देते. ही अंडी पुर्णपणे तयार झाल्यानंतर आपल्या रक्तप्रवाहाच्या माध्यमातून मेंदूपर्यंत जाते. नंतर आपल्या शरीरातील लिव्हर आणि आतड्यांसारख्या अवयावंमध्ये हे जंत पसरतात. ही अळी जेव्हा मेंदूमध्ये जाते तेव्हा मेंदूचा भाग पोकळ करण्यास सुरुवात करते. याचे संकेत मिळतात. डोकेदुखी, अर्धांगवायू किंवा फिट येणे अशी लक्षणे आढळतात. Cerebral cysticercosis हा आजार परजीवी संसर्ग म्हणून ओळखला जातो. हा तीन टप्प्यात होऊ शकतो.

डोकेदुखी होणे हा याचा प्राथमिक टप्पा आहे. कारण यावेळी मेंदूवर सूज आलेली असते. यामुळे आपले डोके दुखते. दूस-या टप्यात फिट यायला सुरुवात होते. तिसरा टप्पा cysticircle granuloma या नावाने ओळखला जातो. यामध्ये शरीराच्या विविध टिश्यूजमध्ये याचे अंड तयार होतात. यास neurocysticercosis असे म्हणतात. यामध्ये रुग्ण बेशुध्द होतो. अस्वस्थता जाणवते. यामुळे त्याच्यावर तात्काळ उपचार करावे लागतात.

यामधील काही प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. या स्टेजला cysticircle granuloma असे म्हणतात. neurocysticercosis चा सामना करण्यासाठी अनेक औषधांचा आणि शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. योग्य वेळी या आजाराचे निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो. भाज्या धुवूनही हे किडे पुर्णपणे नष्ट होत नाहीत. हे पदार्थ उकळून जरी घेतले तरीही हे पुर्णपणे दूर होत नसल्याचे, तज्ज्ञ सांगतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/