‘इबोला’सह ‘या’ ९ व्हायरसपासून देशाला मोठा धोका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला लवकरच व्हायरल किटाणूंपासून लढण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. यामध्ये इबोला सारख्या घातक व्हायरसचा समावेश आहे. या व्हायरसने आफ्रिकेतील अनेक देशांत धुमाकूळ घालत हजारो लोकांचा जीव घेतला आहे. अन्य देशांत देखील या व्हायरसने प्रवेश केला असून भारतात मात्र त्याने अद्यापपर्यंत प्रवेश केलेला नाही.

देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था म्हणजेच (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण संस्था म्हणजेच (एनसीडीसी) यांनी दहा व्हायरल विषाणूंची तपासणी केली आहे जे भारतीयांच्या आरोग्याला धोका बनू शकतात.

यामध्ये इबोला, एमईआरएस-सीओवी, यलो फीवर आणि एविआन इन्फ्लूएंजा यांसारख्या आजारांचा समावेश आहे. याचबरोबर यूसुटु वायरस, टिलापिया नॉवेल हेपेटाइटिस, साइक्लोन वायरस, बेना रियो वायरस इन्सेफेलाइटिस आणि कैनाइन परवोवायरस यांचा देखील समावेश आहे.

याविषयी बोलताना राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतील डॉक्टर बलराम भारगव यांनी म्हटले कि, आंतराष्ट्रीय प्रवाशांकडून भारतीयांना या आजाराची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतीयांनी यासाठी तयार राहावे. युगांडामध्ये जवळपास ३० हजार भारतीय नागरिक राहत आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या या विषाणूची लागन भारतीयांना देखील होणार आहे. त्याचबरोबर काँगो मध्ये देखील भारतीयांबरोबर आपले सैनिक आहेत. तिथे सर्वात जास्त भयंकर स्थिती आहे.

काय आहे इबोला व्हायरस

इबोला व्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू असून एका व्यक्तीद्वारे दुसऱ्या व्यक्तीला या रोगाची लागण होत असते. या विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात ताप येतो. यामध्ये माणसाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. जवळपास ७० टक्के नागरिकांनचा या आजाराची लागण झाल्यानंतर मृत्यू होतो. मिडल ईस्ट मध्ये याला मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनावोरस असेही म्हणतात.

हे आहेत नऊ धोकादायक व्हायरस

१) इबोला
२) एमईआरएस-सीओवी
३) यलो फीवर
४) एविआन इन्फ्लूएंजा
५) यूसुटु वायरस,
६) टिलापिया नॉवेल हेपेटाइटिस
७) साइक्लोन वायरस
८) बेना रियो वायरस इन्सेफेलायटिस
९) कैनाइन परवोवायरस

दरम्यान, २०१२ मध्ये सर्वात आधी हा व्हायरस सऊदी अरबमध्ये आढळला होता. त्यानंतर २६ देशांमध्ये हा पसरला होता. त्यामुळे भारतीयांनी या रोगाच्या लढाईला तयार आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.