काय सांगता ! होय, WhatsApp ग्रुपमध्ये 5000 मेंबर अ‍ॅड करण्याच्या सुविधेसह ‘हे’ 5 दमदार नवे फीचर लवकरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप सतत आपल्या नवनवीन फीचर्सने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असते. यंदाही कंपनी आपल्या फीचर्समध्ये अनेक बदल करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या फीचर्सची चाचणी घेतली जात असून येत्या काळात हे नवे फीचर्स अपडेट केले जाण्याची शक्यता आहे.

१) आपोआप डिलिट होणार मेसेज :
कंपनीच्या या नव्या फीचरची वापरकर्त्यांना उत्सुकता आहे. त्यासाठी या फीचरचा बीटा व्हर्जन उपलब्ध करून दिला होता. याद्वारे वापरकर्त्याने सेट केलेल्या वेळेवर आपोआपच चॅट डिलिट होणार आहेत. यामध्ये हा टाइम सेट एक दिवस ते एका वर्षापर्यंत करता येणार आहे. सुरुवातीला हे फीचर फक्त ग्रुप चॅटसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर हे वैयक्तिकरीच्या देखील होणार असल्याचे बोलले जात आहे.

२) ग्रुप सदस्यांची संख्या वाढणार
अन्य प्रतिस्पर्धी कंपन्या मेसेजिंग अ‍ॅपवर किमान ५ हजार सदस्य अ‍ॅड करण्याची सुविधा देत आहे. तर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये २५६ सदस्यांना अ‍ॅड करता येतं. त्यामुळं स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी ग्रुप चॅट फीचरमध्ये मोठा बदल करणार असल्याचे समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढणारे फीचर लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

३) पर्सनल स्टोरेज :
हे नवीन फीचर चॅटिंग हिस्ट्री आणि मीडिया फाइल्स सेव्ह करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. अँड्रॉइड यूजर व्हॉट्सअ‍ॅप चॅट गुगल ड्राइव्हवर, तर आयओएस यूजर आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट आयक्लाउडवर सेव्ह करतात.

४) सीक्रेट चॅट
वापरकर्त्याच्या प्रायव्हसीसाठी हे फीचर खूपच उपयुक्त फायदेशीर असणार आहे. या फीचरमुळे आपली चॅटिंग हिस्ट्री सर्व्हरवर स्टोर होणार नाही आणि ती ट्रॅकही केली जाऊ शकत नाही. चॅट सेव्ह करण्यासाठी जर कुणी स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न करत असेल चॅट करणाऱ्या दोघांनाही नोटिफिकेशन द्वारे माहिती मिळेल. टेलिग्राम अ‍ॅपमध्ये हे फीचर आधीपासूनच आहे.

५) डार्क मोड
व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरची यूजर्स खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे. या फीचरनंतर व्हॉट्सअ‍ॅपचा इंटरफेस डार्क होणार आहे. याचा फायदा असा होणार कि, चॅटिंगवेळी फोनच्या ब्लू लाइटमुळं डोळ्यांना जो त्रास होत होता. तो आता होणार नाही. हा डार्क मोड फोनच्या बॅटरीची बचत सुद्धा करेल. कंपनीनं बीटा व्हर्जनसाठी हे फीचर लाँच केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –