थेऊर : टॅकरने रिक्षास ठोसरल्याने महिला जागीच ठार तर दोघे गंभीर

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – थेऊरगाव मार्गावर गणेशवाडी नजीक भरधाव टॅकरने ऑटोरिक्षास जोरदार ठोसर मारली यात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघे जखमी झाले जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

लोणी काळभोर चे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी रात्री शेजा-याशी किरकोळ वाद झाल्याने तक्रारदार मंदार राजु सकट आपली बहिण अनितासह लोणी काळभोर पोलिस स्टेशनला आले तेथे त्यांचा मानलेला भाऊ असलम हा पुण्याहून रिक्षा घेऊन आला होता.तेथील काम झाल्यानंतर मंदार सकट, आई, चुलती व अनिताचा मुलगा त्यांनी आणलेल्या रिक्षातून थेऊर येथे पोहोचले तर अनिता व असलम हे त्यांनी आणलेल्या रिक्षातून पाठीमागील रिक्षाने येत होते.

मंदार घरी पोहचल्यानंतर रात्री 12.30 वा सुमारास शेजारी राहणारे तनुजा भहुले हिच्या मोबाईलवर अनोळखी नंबर वरुन फोन आला की ,थेऊर फाटा ते थेऊर रोडवर पावर हाऊस वाशिंग सेंटर समोर रिक्षा व टॅन्करचा अपघात झाला आहे तु लवकर ये असे सागीतले. मंदार अपघात झाले त्या ठिकाणी पोहोचला असता एम एच 12 एच डि 2120 नंबर असलेला इंधन टँकर लोणीकंद – थेऊर फाटा या बाजुने येणा-या टँकरने रिक्षास समोरासमोर धडक देवुन अपघात करुन टॅकर पुढे जावुन उजव्या बाजुस उभा होता तिन आसनी रिक्षा एम एच 12ई क्यु 0453 हि रस्त्याचे बाजुस पलटी होवुन पडलेली दिसली. असलम व रिक्षा चालक यांना मार लागल्याने ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. व बहिण अनिता लोंढे निपचित पडली होती ती जागीच मयत झालेची दिसत होती तेव्हा जमलेल्या लोंकाचे मदतीने असलम व रिक्षा ड्रायव्हर यांना उपचारासाठी ससुन रुग्णालयात पाठवुन दिले.

अपघातानंतर टॅकर चालक तेथून पळून गेला होता. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नितीन सुद्रीक करीत आहेत.