थेऊर : तिघांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या वादावरुन थेऊरमध्ये काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात एका युवकावर तीघांनी कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले असून त्या युवकास लोणी काळभोर येथील खाजगी दाखल करण्यात आले आहे.गुन्हा दाखल झाल्या नंतर एका तासात दोघांना गजाआड केले असून एक जण फरार आहे.

लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी असलेल्या आकाश भंडारी याने दिलेल्या तक्रारी नुसार,काल मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रजासत्ताक दिन असल्याने चौकात मोठी गर्दी होती यावेळी अक्षय सोनवणे व त्याचे अन्य दोन जोडीदार बाबू उर्फ सुमित संजय लोंढे व सकट (पूर्ण नाव माहिती नाही) तो काम करत असलेल्या शुभम मोबाईल शाॅपीवर आले व मागील वादाचे कारण काढून तसेच अन्य एका मित्रासोबत का बोलतो याचा राग मनात धरुन आकाशला दुकानच्या बाहेर बोलावले व अक्षयने त्यास तुला सांगुनही ऐकत नाही आज तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणून डोक्यात कोयत्याने वार केला त्यानंतर बाबू आणि सकट यांनी त्याच्या जवळील कोयत्याने हातावर, नाकावर सपासप वार करुन गंभीर जखमी केले आकाश स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळत सुटला.त्यानंतर आकाशला लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी तपास यंत्रणा कामाला लागली पोलिस नाईक नितीन सुद्रीक गणेश कर्चे यांनी यातील अक्षय धनंजय सोनवणे वय 19 वर्षे.व बाबू उर्फ सुमित संजय लोंढे वय 19 वर्षे यांना पकडले अन्य एक जण फरार असल्याचे कळले.

घटनास्थळी हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख तसेच लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी भेट दिली आहे.