थेऊर : वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचऱ्यास दमदाटी

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – गेली एक वर्षाचे थकीत बिल येणे बाकी असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करुन अंगावर मारण्याची धावल्यामुळे एका व्यक्तीवर लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना काळात अनेक वीज ग्राहकांनी आपले वीज बिल भरले नाही त्यामुळे वीज वितरण कंपनीस ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर येणे बाकी आहे ही थकबाकी जमा करण्यासाठी मंडळाने वसुली चालू केली आहे. कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल तुळजाभवानी यांचेकडे रु.२५३४० इतके देयक बाकी होती त्यामुळे वीज कर्मचारी संपत चौधरी, कनिष्ठ अभियंता सुरेश माने व अन्य एक असे तेथे वीज पुरवठा खंडित करण्यासाठी पोहोचले त्याअगोदर हॉटेलचे मालक अविनाश कुंजीर यांना याची कल्पना दिली होती की आपले मार्च २०२० पासून वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

अविनाश कुंजीर यांनी हे हॉटेल दोन वर्षांपासून अविनाश ताम्हाणे यांना चालविण्यासाठी भाड्याने दिले आहे. अविनाश ताम्हाणे यांनी या वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि वीज कर्मचारी संपत चौधरी यांना धक्काबुक्की करू लागला तसेच चौधरी तुमचे सहा महिने राहिलेत गप रहा नाहीतर परिसरातील लोकांच्या सह्या घेऊन लांब बदली करील अशी धमकी दिली त्यावर आम्ही आमचे काम करतोय असे बोलल्यावर तो अंगावर मारण्यासाठी धावला. पुढील गोंधळ नको म्हणून वीज कर्मचारी तेथून परतले.