Coronavirus : थेऊर झालं ‘कोरोना’मुक्त, 14 रूग्ण झाले बरे

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या कचाट्यातून थेऊर मुक्त झाले असून येथील सर्व चौदा रुग्ण कोरोना वर मात करून आपल्या घरी परतले आहेत त्यामुळे सध्या येथे एकही एक्टीव रुग्ण नसल्याची माहिती कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ. मेहबूब लुकडे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाने सर्वत्र प्रकोप वाढला असून हवेलीतील गावामध्ये दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यात लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, वाघोली, उरुळी कांचन, या मोठ्या लोकसंख्येच्या गावात रुग्णाची संख्या मोठी आहे. यामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण येत आहे. रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. थेऊरमध्ये सुरुवातीला पाच रुग्ण सापडले त्यांना औषधोपचार चालू असताना काही दिवसांनी पुन्हा दोन रुग्ण आढळले त्या पाठोपाठ पुन्हा तीन असीम एकुण चौदा रुग्ण गेल्या तीन आठवड्याच्या काळात सापडले परंतु येथील आरोग्य कर्मचारी महसूल विभाग पोलिस प्रशासन व ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेकविध उपाययोजना करुन ही संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला विशेषतः डाॅ मेहबूब लुकडे, उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ. पुजा सूर्यवंशी, आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार, सेविका भारती सोनवणे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या अधक प्रयत्नातून येथील सर्व कोरोना संक्रमीत रुग्ण आजारावर मात करुन परत आले आहेत.

कोरोनाचा पुन्हा गावात शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी आपली काळजी घ्यावी गेली दहा दिवसाचा लाॅकडाऊन असल्याने अनेक कामे हाती घेता आली यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले यासाठी प्राथमिक शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभले. डाॅ. लुकडे यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की कोणीही कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच तोंडावर मास्क वापरणे अपरिहार्य आहे सोशल डिस्टंशिंगचे कडेकोट पालन करावे गर्दीची ठिकाणे टाळावेत. भाजी मार्केट मध्ये गर्दी होत असल्याने ग्रामपंचायतीने विशेष लक्ष घालून गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.