थेऊर : कोरोना रुग्णांना मिळेनात बेड; उपचारासाठी वणवण भटकण्याची वेळ

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होत असून वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत तरीही नागरिकामधील बेफिकीरपणा अजूनही जात नाही विशेष म्हणजे संपर्कात आलेल्या व्यक्ती सुध्दा मास्क वापरत नाहीत त्यामुळे हे अधिक धोकादायक ठरणार आहे त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम कामास लागल्या तर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

कोरोनाची दुसरी लाट भयंकर रूप घेऊन अनेकांना त्याची लागण होत आहे अशा वेळी प्रत्येकांनी आपापली जबाबदारी स्वीकारुन शासनास सहकार्य करावे जिल्यातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे मास्क वापरणे सामाजिक अंतर राखणे आवश्यक असताना नागरिक याकडे डोळेझाक करतात याचा परिणाम हजारो रुग्णाची पडत जाणारी वाढ होय.

हवेली तालुक्यातील रुग्ण संख्या १०३३ एवढी आहे आणि दररोज यात दीडशे ते दोनशेचीभर पडत आहे. शासकीय यंत्रणा कामाला लागल्या असल्या तरीही त्या कुचकामी पडत आहेत वाघोली व नर्हे येथील कोविड केअर सेंटर आणखी चालू झालेले नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी ही दोन्ही सेंटर या आठवड्यात चालू होतील असे सांगितले आहे. कालच्या आकडेवारी नुसार वाघोळीत २१७ तर उरुळी कांचन येथे ११४, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथे १०९ रुग्ण आहेत तशीच परिस्थिती पूर्व हवेलीतील गावांची होत आहे. यावरून कोरोना संक्रमणाचा दर धोकादायक वळणावर आहे.