Coronavirus : थेऊरमध्ये ‘कोरोना’चे 4 नवे पॉझिटिव्ह

थेऊर पोलिसनामा –  पूर्व हवेलीत कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे नियंत्रणात असलेले संक्रमण आज अचानक चार रुग्ण आढळून आल्याने सर्व विभागाची झोप उडाली आहे.

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत थेऊरमध्ये एकुण 42 रुग्ण आढळले त्यातील 26 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत तर चार रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत आता 8 जण दवाखान्यात उपचार घेत असून आज त्यात आणखी चार रुग्णाची भर पडली आहे.

कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे यांनी सांगितले की, थेऊरमध्ये आजपर्यंत चार जण कोरोनामुळे मृत्यु झाले रुग्ण संख्या पाहता मृत्यू दर दहा टक्क्यांवर आहे हे थोडे चिंताजनक आहे.गेल्या दोन दिवसात एक पुरुष व एक स्री यात दगावली.त्यामुळे नागरिकांनी कोणतेही लक्षणे दिसू लागतात आरोग्य विभागाशी संपर्क करुन माहिती द्यावी त्यामुळे लवकरात लवकर उपचार मिळण्यास मदत होते वेळेत उपचार मिळाल्यानंतर कोरोनावर मात करता येईल.

या कोरोनाच्या काळात आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी अतिशय दक्ष असून कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाॅ मेहबूब लुकडे तसेच थेऊर येथील उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ पुजा सूर्यवंशी आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार सेविका भारती सोनवणे तसेच सर्व आशा सेविका आपल्या कामात सातत्य दाखवत आहेत परंतु येथील स्थानिक नागरीक मात्र फार गांभिर्याने घेताना दिसत नाहीत तोंडावर मास्क वापरणे अपरिहार्य असताना मास्क देखील बिना मास्कचे फिरत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like