थेऊर : 2 सख्या बहिणीवर जवळच्या नातेवाईकाने केला अत्याचार

थेऊर – बाल लैंगिक अत्याचार व महिला वरिल अत्याचारात न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाईमुळे अनेकजण निर्ढावलेले असून या अत्याचारामध्ये कमी येताना दिसत नाही अशाच एका घटनेत सावत्र बहिणीच्या नवर्याने दोन अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या बहाण्याने घराबाहेर नेऊन उरुळी देवाची येथील लाॅजवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

लोणी काळभोरचेपोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडीत मुलींची आई ही आपल्या तेरा व चौदा वर्षे वयाच्या मुलीसह राहते त्याच्याकडे त्यांचा सावत्र बहिणीचा नवरा सुनिल कोंडिबा जेधे रा.भिवरी ता.पुरंदर कायम येत असे तो आल्यावर आपल्या लहान मेहुण्यांना वेगवेगळे कारण सांगून घराबाहेर न्यायचा कधी कपडे खरेदी करायचे तर कधी बाहेर फिरायला म्हणून घेऊन जात असे व उरुळी देवाची परिसरातील लाॅजवर नेऊन अत्याचार करत असे आणि कोणाला सांगितले तर आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत असे.हा प्रकार जानेवारी 2020 पासून चालू होता. दरम्यान गेली काही दिवस आपल्या मुली खुपच गप्प बसून आहेत याचे नेमके कारण काय हे जाणून घेण्यासाठी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता वरील सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी गंभीर दखल घेतली असून नराधमास अटक केली त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक झिंजुर्के करीत आहेत.

या घटनेवरुन उरुळी देवाची परिसरातील लाॅजवर वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचे अधोरेखित होत आहे.तसेच एवढ्या छोट्या मुली लाॅजवर घेऊन गेल्यावर याची चौकशी कशी करण्यात आली नाही याचे लाॅजींग रजिस्टरमध्ये नोंदी केल्या गेल्या नाहीत का ?जर या नोंदी होत नसतील तर या लाॅजवर पोलिस अधीक्षक काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.यावर सामाजिक विभाग नेमक काय लक्ष ठेवतोय हेही यावरुन स्पष्ट होत आहे