थेऊर : देऊळ उघडल्याने दर्शनासाठी भक्तांची गर्दी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन   –   दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर येथील चिंतामणी मंदिर आज दर्शनासाठी खुले करण्यात आले गेली आठ महिन्यापासून बंद असलेली दरवाजे आज पहाटे पाच वाजता उघडली आणि भक्तांना देवाचे दर्शन झाले हा आनंद भाविकांच्या चेहर्यावर जाणवत होता पण पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंशिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचे अनुभवास आले व्यवस्थापनाकडून अपुरे मनुष्यबळ नियमाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.

आनलाॅकच्या घोषणे नंतर देशातील धार्मिक स्थळे खुली झाली परंतु महाराष्ट्र शासनाने खबरदारी राखत ही प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला परंतु कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आल्यावर आज पाडव्याच्या दिवशी धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील मोठ्या तिर्थक्षेत्री नियमाचे कडेकोट पालन करीत देवदर्शन चालू केले.

आज पहाटे पाच वाजता देवालयाचे पुजारी ॐकार आगलावे यांनी महापुजा केली व मंदिर दर्शनासाठीखुले केले आज चिंतामणीला पाडव्याच्या दिवशी सर्व अलंकारासह सजवलेले होते त्यामुळे विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भक्तानी गर्दी केली होती.

थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी आज सकाळ पासून हजेरी लावली चिंचवड देवस्थानच्या वतीने दर्शनबारीची व्यवस्था चौकोन आखून केलेली दिसली परंतु त्याचा काही उपयोग होताना दिसत नव्हता भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडल्याचे स्पष्ट दिसत होते.अनेक भाविक फोटो काढताना गर्दी करत होते मुखपट्टी काढून बिनधास्त फोटो काढत होते. मंदिराच्या प्रवेश द्वारावर थर्मल स्क्रिनिंग केली जात होती.

आठ महिन्यापासून शांत असलेल्या चौकात आज नवचैतन्य फुलल्याचे अनुभवास आले भाविकांच्या आगमणाने दुकानदार फुले विक्रेते सर्वच आनंदी असल्याचे दिसले.