थेऊर : जबाबदारी निश्चित झालेल्या ‘कृषी’च्या संचालकावर कारवाई व्हावी

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन –   कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आरोप निश्चित झालेल्या संचालकांवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी प्रभाकर जगताप यांनी जिल्हा उपनिरीक्षक पुणे यांच्याकडे केली आहे याविषयीचे पत्र त्यांनी दिले आहे.

सन 1999 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वर कार्यरत असलेल्या संचालक मंडळाने मनमानी कारभार करुन कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला याची मुलानी आणि कंपनी या चौकशी अधिकार्याने चौकशी पूर्ण करुन पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांना अहवाल सादर केला यावर जिल्हा उपनिरीक्षक संजय भोसले यांनी जबाबदारी निश्चित केली व त्यांचेकडून ही वसूली करण्याचे आदेश दिले होते या गैरकारभारामुळे शेतकरी व व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले.

यावर संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु ती न्यायालयाने फेटाळली असून विशेष म्हणजे पणन संचालकाचा फेर चौकशीचा आदेश असताना या गैरकारभार करणार्या संचालकावर कारवाई झाली नाही तरी आपण तात्काळ यावर योग्य पावले उचलून कारवाई करावी अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल अशी मागणी प्रभाकर जगताप यांनी या निवेदनात केली आहे.

सध्या कोरोना महामारीच्या काळात आपण लवकर हे प्रकरण तडीस लावाल अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे अन्यथा शेतकरी मोठ्या संख्येने अंदोलन उभारतील याला आपण जबाबदार असाल हेही यात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील तसेच खासदार सुप्रिया सुळे यासह जिल्हाधिकारी पुणे यांनाही देण्यात आले आहे.