थेऊर : गोरगरिबांची दिवाळी गोड, के जी फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीच्या काळात अनेकांची कामे गेल्याने बेरोजगार झालेल्या गोरगरीबांना दिवाळीचा आनंद मिळाला नाही यावर थेऊर येथील के.जी. फाऊंडेशनच्या वतीने अशा काही कुटूंबातील लहान मुलांना कपडे व मिठाईचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

थेऊर येथील व्यावसायिक खंडू गावडे यांनी आपल्या के जी फाऊंडेशनच्या माध्यमातून मध्यमवर्गीय व गरीब गरजूंना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जाते.सध्याच्या परिस्थितीत केवळ कामगार वर्ग सोडला तर दिवाळीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांना अवघड होता.यावर गावडे यांनी एक कार्यक्रम घेऊन नवीन कपडे व मिठाईचे वाटप केले यावेळी हवेलीच्या उपसभापती हेमलता बडेकर, सिताराम लांडगे,सुरेश वांढेकर, रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, लक्ष्मण चव्हाण, विकास माने आदी मान्यवर उपस्थित होते.