थेऊर येथील भक्तनिवासाचं खा. अमोल कोल्हेंच्या हस्ते भूमिपूजन

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून थेऊरला तिर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला असून येथे शासन विकासकामे करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी देते. याच निधीतून थेऊर येथे भक्तनिवास उभारण्यासाठी एक कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे या कामाचे भुमीपूजन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर थेऊर येथील अशा विविध विकास कामांचे भुमीपूजन तसेच लोकार्पन सोहळ्याचे आयोजन खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, मा.पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे राज्याचे संचालक मंगेश चिवटे, हवेली राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेलीचे उपसभापती युगंधर काळभोर, शिंदवणे गावचे सरपंच आण्णा महाडिक, थेऊरच्या सरपंच संगीता तारू, उपसरपंच विलास कुंजीर, मा.सरपंच छाया काकडे, सुरेखा कुंजीर, नंदा कुंजीर, मा.उपसरपंच आप्पासाहेब काळे, शहाजी जाधव, भरत कुंजीर,ग्रामपंचायत सदस्य नितीन कुंजीर, राहुल कांबळे, काशीनाथ कोळेकर, गजानन आगलावे, विनोद माळी, संगीता गावडे, गंगुबाई चव्हाण, पल्लवी साळुंके, मिनाक्षी कांबळे, दिपाली घुगे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदाम गावडे, मा.संचालक रामभाऊ कुंजीर हे उपस्थित होते.

यावेळी खासदार कोल्हे यांनी थेऊरच्या विकासासाठी भरीव मदत करणार असल्याचे सांगितले तसेच मतदार संघातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या ओझर, लेण्याद्री आणि रांजणगाव या देवस्थानांनाही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.तसेच आमदार अशोक पवार यांनीही थेऊर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून थेऊरला तिर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळाला आहे, आता पर्यटन विभागाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात आमदार पवार व खासदार कोल्हे यांनी याबाबतचे शिफारस पत्र ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले. तसेच गावातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी गावाबाहेरून जागा उपलब्ध झाल्यास बायपाससाठी निधी देण्याची ग्वाही दिली.जिल्हा परिषद अध्यक्ष देवकाते यांनी आज पर्यंत याभागातील आमदार व खासदार हे विरोधी पक्षांचे होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी थेऊरला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. पवार व कोल्हे यांच्याकडे पाहत देवकाते यांनी, आता यापुढे तुम्ही दोघांनी थेऊरला भरघोस निधी देण्याची जबाबदारी घ्यावी असे सांगितले.

ग्रामस्थांच्या वतीने तात्यासाहेब काळे व हिरामण काकडे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत, सत्कार, प्रास्ताविक केले. तसेच थेऊरला तिर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. आता पर्यटनक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रालयात दाखल करणार असल्याचे युवराज काकडे यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/