थेऊर : रावण दहनाने ऐतिहासिक दसरा मोहोत्सवाची सांगता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – अपप्रवृत्तीवर सद्प्रवृत्तीचा विजय म्हणजेच विजयादसमी होय. थेऊर येथील ऐतिहासिक दसरा व नवरात्र उत्सवाची सांगता रावण दहनाने झाली.येथील दसरा महोत्सव ऐतिहासिक असून श्री चिंतामणी गणपतीची उत्सव मूर्ती पालखीतून सीमोलंघनासाठी निघते.संपुर्ण गावाला नगर प्रदक्षिणा घातली जाते तसेच गावच्या पूर्व दिशेला नायगांव रस्त्यावर शमीच्या झाडाची विधिवत पुजा करतात.

श्री चिंतामणी गणपती मुर्तीस विविध रत्न अलंकाराने सजवण्यात आले होते मंदिराचे पुजारी महेश आगलावे यांनी आजची सजावट केली श्रींची मूर्ती अतिशय विलोभनीय व आकर्षक वाटत होती.हे रुप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

थेऊरचे ग्रामदैवत महातारीआई देवीच्या मंदिरात घटस्थापनेस नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर नऊ दिवस वेगवेगळ्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज विजयादसमीच्या मुहूर्तावर सायंकाळी चार वाजता चिंतामणी गणपतीची उत्सव मूर्ती पालखीतून मोठ्या थाटात सीमोलंघनास निघाली.यावेळी येथील मंदिराचे पुजारी आगलावे बंधू यांच्या भारत बॅडच्या तालावर गावातील लहान थोर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालखी मार्गावर जागोजागी रांगोळ्याच्या व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तसेच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, साखर कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, उपसरपंच विलास कुंजीर, शहाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य नितिन कुंजीर, राहुल कांबळे, काशिनाथ कोळेकर, गजानन आगलावे, माजी उपसरपंच भरत कुंजीर, ज्ञानोबा कुंजीर, सुदाम गावडे, यशवंत कुंजीर, संजय गावडे, शैलेंद्र आगलावे, राहुल आगलावे, संकेत आगलावे, मुकुद आगलावे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उत्सवाचे आकर्षण म्हणजे येथील मुख्य चौकामध्ये देवीच्या गाण्याच्या ताफ्यांकडून आपली कला सादर झाली व शेवटी पेशवेवाडा येथे रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.

Visit : Policenama.com 

You might also like