थेऊर : संकष्टी चतुर्थीस बाहेरूनच दर्शन

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन  –  आनलाॅक चार ची घोषणा झाल्यानंतरही आणखी धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे आज संकष्टी चतुर्थी असूनही थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन भाविकांना घेता आले नाही.

आज भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले थेऊर येथे श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात परंतु कोरोना महामारीच्या अनुषंगाने सर्व देवालये बंद करण्यात आली त्यामुळे गेल्या सहा महिने हे देवालय बंद आहे.परंतु येथील नैमित्तीक पुजा चालू असून आज पहाटे देवालयाचे पुजारी भूषण आगलावे यांनी महापुजा केली त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरेश्वर पेंडसे यांनी महापुजा केली. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी मात्र बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन परतले.

खरेतर या धार्मिक पर्यटनस्थळी अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे परंतु सहा महिने सर्व व्यवहार बंद असल्याने आर्थीक अडचणी वाढल्या आहेत. शासनाने एकतर आम्हाला आर्थिक मदत करावा अन्यथा देवालये उघडी करावीत अशी मागणी होत आहे.