थेऊर : भरधाव वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – पुणे – सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी गावच्या हद्दीत थेऊर फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षारक्षक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात दत्ताराम गोविंद अडागळे (वय- ६३, रा. दातार कॉलनी,उरुळी कांचन, ता.हवेली) हे याअपघातात मृत्युमुखी पडले आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आत्माराम अडागळे यांनी लोणी काळभोर पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार, लोणीकंद थेऊर फाटा रस्त्याचे काम चालू असल्यामुळे गेली काही दिवसांपासून हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे जड वाहने जाऊ नयेत म्हणून कालिका सिक्युरिटी या कंपनीला या रस्त्याच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यानुसार दत्ताराम अडागळे हे सिक्युरिटी गार्ड म्हणून रात्र पाळीवर होते.

आज रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुरक्षारक्षक अधिकारी मोहन प्रेमचंद यांचा अविनाश यांना फोन आला की थेऊर फाटा या ठिकाणी तुमचे चुलते दत्ताराम अडागळे हे काम करीत असताना अपघात झाला असून तुम्ही लवकर या. त्यावेळी चुलत भाऊ सिद्धार्थ अडागळे, सनी अडागळे, असे थेऊर फाट्यावर पोहोचले तेथे सिक्युरिटीत काम करत असलेले बेनी सवारे यांनी सांगितले की चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडील बाजूने पुणेकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने गोविंद अडागळे यांना धडक दिली.या धडकेत ते रस्त्यावर पडले त्यानंतर अनेक वाहने अंगावरुन गेल्याने शरीराचा चेंदामेंदा झाला होता. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस घेत आहेत.