ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून ‘रात्रगस्त’

थेऊर : पोलिसनामा ऑनलाइन – गाव सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वयंपूर्ण व्हावे यासाठी गाव पातळीवर ग्रामसुरक्षा पथके तयार करुन त्याच्यामाध्यमातून दररोज रात्र गस्ती पथके तयार करण्यात येत असून युवकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले ते थेऊर येथे ग्रामसुरक्षा पथकाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी थेऊर पोलिस मदत केंद्राचे पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, राजु महानोर, पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर, पोलिस पाटील रेश्मा कांबळे व मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

कोरोना संक्रमण काळात पोलिस प्रशासनावर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीसह अन्य अनेक कामे करावी लागत आहेत.मर्यादित पोलिस बल असल्याने गुन्हे प्रकटीकरण करण्याच्या कामावर लक्ष जास्त केंद्रीत करण्यासाठी गाव पातळीवर अंतर्गत सुरक्षेसाठी रात्री गस्त वाढवण्यासाठी गावात ग्राम सुरक्षा पथकाच्या माध्यमातून युवकावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या दरोडेखोरी चोर्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसावर ताण येत आहे त्यामुळे प्रत्येक गावात या सुरक्षा पथकाच्या माध्यमातून पोलिस व स्वयंसेवक काम करणार आहेत