थेऊर : ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचार शिगेला

थेऊर : लवकरच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत रंग भरण्यास सुरुवात झाली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे तशी ही निवडणूक नात्यागोत्याच्या नाजुक विनीत गुंफलेली असते जो नेता याचे वर्म जाणतो तोच बाजी मारतो.सध्या हवेली तालुक्यातील पूर्व पट्ट्यात या निवडणूक प्रचाराचा धुराळा उडालेला आहे यामध्ये सर्वात चुरशीची लढत लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणूकीत निवडणूकीत अनुभवास येत आहे.

हवेली तालुक्यातील थेऊरसह कुंजीरवाडी सोरतापवाडी आळंदी म्हातोबा अशा गावामध्ये निवडणूकीची रणधुमाळी उडाली आहे.थेऊरमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आपापल्या परीने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यात प्रामुख्याने लढत यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडूरंग काळे, काकडे राज्य साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांच्या चिंतामणी ग्रामविकास पॅनेल आणि माजी पंचायत समिती सदस्य महादेव काकडे व हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रभागा सयाजी काकडे, माजी सरपंच नवनाथ काकडे याच्या महातारीआई ग्रामविकास पॅनेल यांच्यात आहे.तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य कावेरी कुंजीर व यशवंतचे माजी संचालक मारोती कुंजीर, रामभाऊ कुंजीर यांनी जय गणेश परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून काही प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास माळी माजी सरपंच अलका कुंजीर आणि ज्ञानेश्वर पिंपळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरून आपले नशिब आजावत आहेत.