थेऊर : कोरोना रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून नागरिक मात्र सुचनांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत आहेत याचा परिणाम हवेलीतील महसूलसह आरोग्य विभागातील काही कर्मचारी अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत.

गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली आहे विदर्भ मराठवाडया नंतर पुणे व मुंबईत रुग्ण संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे हवेलीच्या पूर्व भागातील गावांमध्ये पॉजिटीव रुग्ण समोर येत आहेत तरीही नागरिकांत मात्र याबद्दल कोणत्याही प्रकारची भीती दिसून येत नाही. अनेक महिन्याच्या कालावधी नंतर आठवडे बाजार चालू झाले आहेत मात्र येथे होणारी गर्दी मास्कचा वापर नसणे याकडे प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे ते होताना दिसत नाही.

पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या अनेक मंगल कार्यालयात कोरोना संदर्भातील नियमांचे सर्रासपणे होत असलेल्या उल्लंघनाकडेही दुर्लक्ष होत आहे संबधीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे हे अपेक्षित आहे परंतु तसे होत नाही कारण किती कार्यालयावर कारवाई केली याची माहिती उपलब्ध होत नाही.

प्रत्येक गावात ग्रामसेवकानी विनामास्क फिरणाऱ्या ग्रामस्थावर कारवाई करण्याची गरज आहे पण तेही निवांत आहेत दुकांदारांसाठी शासनाने काही नियमावली ठरवली आहे परंतु दुकानात त्याची अंमलबजावणी होत नाही यावर कोण कारवाई करणार.

कुंजीरवाडीचे माजी तंटामुक्त अध्यक्ष बापू घुले यांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली असून ग्रामस्थांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करत त्रिसूत्रीची अमलबजावणी करावी असे म्हणाले.