थेऊर : रस्ते वाहतूक शाखेच्या वतीने प्रबोधनपर चित्ररथाचे आनावरण

थेऊर – रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून बारामती फाटा येथील पुुणे महामार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्ग सुरक्षा प्रबोधन चित्ररथाचे उद्घाटन थेऊर फाटा येथे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. या रथाच्या माध्यमातून चालकांचे प्रबोधन केले जाणार आहे. राज्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कार्यकालावधीत ३२वा रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिक व चालकात जनजागृती करणे, हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट वापरणे, ड्रंक अँड ड्राईव्हला प्रतिबंध, चुकीच्या मार्गाने वाहन चालविणे व वळण घेणे आदी बाबींचे व्हिडीओ या चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहेत.ज्यामध्ये वाहतुकीच्या नियमबाबत जनजागृती होईल असे मत पुणे महामार्ग पोलीस बारामती फाटा विभागाचे सहा. पोलीस निरीक्षक युवराज नांदरे यांनी यावेळी बोलताना मांडले.

या चित्र रथासाठी अमीर चिकन चे संचालक विजय मोरे,पुण्यनगरीचे नगरसेवक योगेश ससाणे,कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे,शरद पुजारी,गणेश धुमाळ,इनायत शेख,अजिंक्य भारद्वाज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

रस्ता सुरक्षा अभियान वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय व पुणे महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक राजन सस्ते,सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज नांदरे,उपनिरीक्षक महेश कोंडुभरी,विनोद जोकार व बारामती फाटा चे सर्व पोलीस अंमलदार वाहतुकीच्या सुरक्षा अभियानाअंतर्गत नागरिकांमध्ये प्रबोधन करत आहेत.यावेळी थेऊर फाटा येथे हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचे फुल देऊन हेल्मेट वापरण्याची व वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमास पुणे परिवहनचे निरीक्षक मिरजकर तसेच लोणी काळभोर वाहतूक शाखेचे संदिप देवकर, शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर,सुरेश कुंजीर,जयसिंग उंदरे,गोरख तुपे व लोणी काळभोर वाहतूक शाखेचे वाॅर्डन व इतर मान्यवर उपस्थित होते.