थेऊरफाटा : दोन दरोडेखोर गजाआड, LCB च्या पथकाची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – थेऊरफाटा येथील ताम्हाणे वस्ती येथे ऑक्टोबर महिन्यात घालण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यातील दोन दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून यातील अन्य दोन अद्याप फरार आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी ता.हवेलीतील येथील ताम्हाणेवस्तीमध्ये दि 19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला यात गणेश ताम्हाणे व त्यांची पत्नी वर्षा ताम्हाणे याच्यावर घातक शस्त्राने प्रहार करण्यात आले. यात हे दांपत्य गंभीर जखमी झाले. वस्तीवर आरडाओरडा झाल्याने दरोडेखोर पळून गेले.

यातील वर्षा ताम्हाणे यांचे उपचारा दरम्यान दि 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यामुळे या गुन्ह्याचे गांभीर्य वाढले.यावर तपास करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले यात सहाय्यक पोलिस दत्तात्रय गुंड पोलिस हवालदार महेश गायकवाड निलेश कदम सचिन गायकवाड गुरु गायकवाड सुभाष राऊत अक्षय जावळे यांचा समावेश होता.

या गुन्ह्यातील एक अरोपी मंगेश उर्फ सुनिल बिटक्या काळे रा.वागदरी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर यास श्रीगोंदा पोलिसांनी वाहन चोरीच्या अरोपात अटक केली होती या दरम्यान अधिक तपास करत असता त्याने ताम्हाणेवस्तीमध्ये घातलेल्या दरोड्या संदर्भात कबुली दिली यावरुन त्याचे साथीदार दिलीप उर्फ टिल्या दर्या भोसले रा.लिंपनगाव ता.श्रीगोंदा व अन्य दोन असल्याचे निष्पन्न झाले.

या गुन्ह्यातील दुसरा अरोपी दिलीप उर्फ टिल्या दर्या भोसले हा दौण्ड येथे येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली यावर या पथकातील पोलिसांनी वेषांतर करुन दौंड काष्टी मार्गावर सापळा रचला व त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले. सध्या हे दोन्ही अरोपी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या ताब्यात असून अन्य दोन अद्याप फरार असल्याने त्यांचा तपास चालू आहे.

थेऊरफाटा येथील हा दरोडा अत्यंत क्रूर व गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिशय गंभीर दखल घेऊन सहाय्यक पोलिस अधीक्षक विवेक पाटील तसेच जयंत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Visit : Policenama.com