थेऊरच्या रस्त्याची अक्षरशः ‘चाळण’,चालकांना मणक्याचं तर वाहनांना दुरूस्तीचं ‘ग्रहण’ !

 पुणे (लोणी काळभोर) : पोलीसनामा ऑनलाइन – अष्टविनायकापैकी एक असलेल्या आणि पुणे शहरालगत असलेल्या थेऊरकडे येणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून वाहनांचे व वाहन चालकांचे मोठे नुकसाव होत आहे. या रस्त्याने प्रवास करताना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनांना खड्डे चुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे.

अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर येथील चिंतामणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात परंतु थेऊरफाटा ते थेऊरगाव हे अंतर फक्त दहा मिनिटाचे असून त्यासाठी आता अर्धा तासाचा कालावधी लागत आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे चिंतामणी विद्यामंदीर चौक, मराठी शाळा, शिवम वॉशिंग सेंटर, गणेशवाडी, दत्तनगर, कुंजीरवस्ती, गाढवे काॕर्नर पर्यंत अनेक मोठे खड्डे पडले आहेत.

त्यामुळे या महामार्गावर वाहन चालवताना बाईकस्वारांसह कार गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, खड्डयांमुळे वाहतुक कोंडीत मोठी वाढ झाली आहे तसेच रस्त्यावरील खडड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने लहान मोठा अपघात होत आहेत त्यामुळे या रस्त्याविषयी गणेशभक्तांसह वाहनचालक तसेच गावातील तरुणांमध्ये तीव्र नाराजी असून सध्या गावात सोशल मिडियात या रस्त्याच्या कामाविषयी खरपूस समाचार घेतलेला पाहवयास मिळत आहे, अनेक तरुणांनी तर या रस्त्याविषयी सोशल मिडियाच्या माध्यामातून आपला सरकार विषयी तिखट शब्दात समाचार घेत आहेत.

यामध्ये अनेक जोक तसेच व्हिडीओ क्लिप फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप वर बघायला मिळत आहे अष्टविनायक रस्ते प्रकल्पांतार्गत रस्त्याचे काम सुरु असून सदर रस्त्याचे भूमिपूजन एक वर्षापूर्वी झाले असून कामास प्रत्यक्ष सुरुवात कोलवडी ते केसनंद ह्या पाहिला टप्यात झाली असून दुसरा टप्पा थेऊर ते थेऊरफाटा आहे तर तिसरा टप्पा हा केसनंद ते लोणीकंद आहे परंतु थेऊरगावापासुन फाट्यापर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे थेऊरच्या रस्त्याने प्रवास नको रे बाबा म्हण्याची वेळ सध्या तरुणाईवर आली आहे.

त्यामुळे सरकारच्या चाललेल्या विकासकामांची चांगलीच खिल्ली तरुणाई उडवत आहे, त्यामुळे रस्ता होईल तेव्हा होईल परंतु रस्त्यावर असलेले खड्ड्यांचे संकट तात्पुरते डागडुजी न करता चांगल्या प्रतिचे डांबर टाकून खड्डे भरुन दूर करा अशी मागणी गणेश भक्तांसह थेऊर ग्रामस्थ करत आहे. यात विशेष म्हणजे विरोधकही मुग गिळून बसल्याचे दिसून येते. याविषयी विरोधकांनी कुठे अंदोलन अथवा विरोध केल्याचे दिसत नाही यावरुन हे काय भूमिका बजावतात असा सवाल नागरिक विचारत आहेत.