ज्यांच्याकडे WhatsApp, Facebook नाही, ज्यांना Email समजत नाही त्यांनी आमची नावे ‛ED’ ला जोडणे हेच मोठे दुर्दैव : महेश भागवत

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) –  सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. या तंत्रज्ञानाच्या काळात ज्यांना स्वतःचे व्हाट्सअप, फेसबुक नाही, ईमेल समजत नाही अश्यांनी आमच्या नावाने ‛ईडी’ ला घाबरून भाजपमध्ये गेले अशी ओरड करून लोकांमध्ये संभ्रम पसरवावा हेच मोठं दुर्दैव असून ईडी ची चौकशी किती कोटींच्या पुढे गेल्यावर लागते याचा खुलासा त्यांनी अगोदर करावा अशी टिका भीमा पाटसचे मा.संचालक महेश भागवत यांनी यवत येथे केली.

ते भाजप शिवसेना महायुतीचे विधानसभेचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. भागवत यांनी पुढे बोलताना ज्यांना ईडी चा अर्थ माहीत नाही त्यांनी आम्ही ईडी च्या भीतीने भाजपमध्ये प्रवेश केला असा आरोप आमच्यावर करणे हे हास्यास्पद आहे. आम्ही दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची दूरदृष्टी, तालुक्यात चाललेली विकास कामे आणि पाण्याबाबत सुरू असलेले त्यांचे उत्कृष्ठ काम पाहून त्यांना पाठिंबा दिला आहे.

कुणाच्या दबावाखाली आम्ही भाजपमध्ये आलो नाही तर भाजप सरकार आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला देत असलेला न्याय, दौंड तालुक्यात विकासकामांसाठी त्यांनी पाच वर्षात उपलब्ध केलेला निधी हे तालुक्याला निश्चित मोठे करण्याचे धोरण असून यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना नेते अनिल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दौंड तालुक्यात मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर असून आता खऱ्या अर्थाने आपलं दौंड बदलतंय असे गौरोवोद्गार काढले.

या सभेला दौंडचे आमदार राहुल कुल, धनगर समाजाचे नेते आनंद थोरात, जेष्ठ नेते प्रेमसुख कटारिया, नंदुभाऊ पवार, अनिल सोनवणे, तानाजी दिवेकर, नागेसन धेंडे, सुरेशभाऊ शेळके, शब्बीरभाई सय्यद, बाळासाहेब लाटकर यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Visit : Policenama.com 

You might also like