होमगार्डचे वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाले – ‘ते आमच्याकडून मालीश करून घेतात, आक्षेपार्ह काम करायला सांगतात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील एका होमगार्डने आपल्या विभागातील वरिष्ठ अधिका-यावर सनसनाटी आरोप केले आहेत. वरीष्ठ अधिकारी ड्युटीवर असताना तेल मालिश करायला लावतात. तसेच मद्यापान करण्यास भाग पाडतात. एवढेच नाही तर आपल्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करण्यास सांगतात. तसे न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात, असा आरोप होमगार्डने केला आहे. या प्रकरणी पीडित होमगार्डने या प्रकरणाची तक्रार होमगार्ड डिजी यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्हा कमांडेट अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, पीडित होमगार्डच्या या गंभीर तक्रारीनंतर विभागामध्ये गोंधळ उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनौर होमगार्ड कार्यालयातील आहे. पीडित होमगार्ड गेल्या अनेक वर्षापासून याच कार्यालयात तैनात आहेत. पीडित होमगार्डचा आरोप आहे की, जिल्हा कमांडेट रमेश कुमार माझ्याकडून जबरदस्तीने तेल मालिश करवून घेतात. रात्री नॉन व्हेज बनवल्यानंतर मद्यप्राशन करण्यास भाग पाडतात. याबाबत त्यांना अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जेंव्हा त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही तेव्हा. त्रस्त होऊन मी होमगार्ड डीजी यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हा कमांडेट रमेश कुमार म्हणाले की, त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. सदर होमगार्ड कार्यालयात अनुपस्थित राहत होता. त्यामुळे आम्ही त्याला खडसावले होते. त्यामुले तो कुणाचे तरी ऐकून तक्रार करत आहे. जेंव्हा तपास होईल तेव्हा सत्य समोर येईल असे म्हटले आहे.