‘ते’ दहशतवाद्यांसारखे दिसतात

हैदराबाद : वृत्तसंस्था  – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवाद्यासारखे दिसतात, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयाशांती यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशाला त्यांची भीती वाटते तसेच सगळ्या जनतेला ते घाबरवत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. शनिवारी (9 मार्च) तेलंगणामध्ये काँग्रेसच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवाद्यासारखे दिसतात. कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील याची सतत भीती वाटते. त्यामुळे मोदींना सगळेच लोक घाबरतात. जनतेवर प्रेम करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला घाबरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या माणसाने कसं नसावं याचं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे विजयाशांती यांनी म्हटले आहे.

Loading...
You might also like