2 महिन्याच्या चिमुरडीला पळविण्याचा प्रयत्न, तिघांना पकडून नागरिकांनी धो-धो धुतला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – रोजंदारीसाठी नगरला आलेल्या दाम्पत्याच्या अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकडीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक महिला व पुरुषांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. आज दुपारी रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, परभणीतले सतीष रमेश केरापली हे रोजंदारीच्या निमित्ताने नगर येथे येत होते. कोपरगाव येथील रेल्वे स्थानकावर दोन भामटे व एक महिला त्यांना भेटली. तुम्हाला एक हजार रुपयांप्रमाणे काम देतो. नगरमध्ये जाऊ, असे त्यांना सांगितले. रोजगाराच्या अपेक्षेने दाम्पत्य त्यांच्यासोबत नगरला आले. नगरमध्ये रेल्वे स्थानकावर आल्यानंतर हे जोडपे गप्पांच्या नादात असताना या तरूणांनी दोन
महिन्याच्या चिमुरडीला उचलून चारचाकी वाहनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या जोडप्याने आरडाओरड केल्यामुळे गाडीतून पळण्याचा प्रयत्न केला. दाम्पत्याने आरडाओरड केल्याने परिसरातील तरुणांनी मुलगी पळवणाऱ्या दोघांना व एक महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर जमावाने त्यांची चांगलीच धुलाई केली.
 घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलीला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

visit : Policenama.com 

You might also like