Thick Thighs-Round Buttocks | मोठ्या मांड्या आणि नाशपती आकारासारख्या लोकांच्या आरोग्यासंबंधी मोठे रहस्य आले समोर; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Thick Thighs-Round Buttocks | दिर्घ आणि आरोग्यदायी जीवनासाठी लोक सर्व प्रयत्न करत असतात. मात्र, खाण्या-पिण्यापासून राहण्याच्या पद्धतीत बदल करूनही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. मनुष्याच्या दिर्घायुष्याच्या पाठीमागे त्याच्या शरीराच्या आकाराची सुद्धा (Thick Thighs-Round Buttocks) महत्वाची भूमिका असते (Thick thighs and round buttocks can be useful in prolonging life).

नाशपती आकारात खालील भाग रूंद
एका एक्सपर्टचा दावा आहे की, जाड मांड्या आणि गोलाकार नितंब मनुष्याचे आयुष्य वाढवण्यात उपयोगी ठरू शकतात. डॉक्टरांनी मिडल बॉडीसाठी Pear आकार म्हणजे नाशपतीसारखा आकार चांगला असल्याचे म्हटले आहे. नाशपती आकाराच्या लोकांच्या शरीराच्या वरील भागाच्या तुलनेत खालील भाग जास्त रूंद असतो. (Thick Thighs-Round Buttocks)

 

हृदयाच्या आजारांचा धोका कमी
टिक-टॉकवर एक व्हिडिओ पोस्ट करत ब्रिटनच्या एनएचएसचे (National Health Service) डॉक्टर करण राजन (Doctor Karan Rajan) यांनी म्हटले, रिसर्च सांगतो की, पोट किंवा आतड्यांऐवजी ग्लुटोफेमोरल एरियात (Glutofemoral area) फॅट जमा झाल्याने कार्डियोव्हस्क्यूलर डिसीज म्हणजे हृदयाचे आजार आणि मेटाबॉलिक डिसीजचा धोका कमी होतो. डॉक्टर करण यांनी सांगितले की, हे दोन्ही प्रकारचे फॅट शरीरात वेगळ्या प्रकारे काम करतात.

 

दोन प्रकारचे फॅट करते असे काम
एक्सपर्टने म्हटले, आतड्यांमध्ये जमा फॅट अवयवांना चारही बाजूंनी गुंडाळू शकते आणि सायटोकिन्स-फॅटी अ‍ॅसिड रिलीज करू शकते, जे इन्फ्लेमेशनचे कारण ठरते. यामुळे शरीरात हार्ट (हृदय) सह अनेक प्रमुख अवयवसुद्धा डॅमेज होऊ शकतात. तर ग्लुटोफेमोरल फॅट सामान्यपणे त्वचेच्या आत पसरते.

 

मोठ्या मांड्यांचा हा आहे लाभ
शरीराच्या या भागात फॅट एक स्पंजप्रमाणे काम करते. ते फॅटी अ‍ॅसिड स्टोअर करते आणि शरीराच्या आतील भागात त्यास पसरण्यापासून रोखू शकते. यासाठी मोठ्या मांड्या मनुष्याचे आयुष्य वाढवण्यात खुप लाभदायक ठरू शकतात.

 

डॉक्टर करण यांनी हेसुद्धा सांगितले आहे की, ग्लुटोफेमोरल एरियामध्ये जमा फॅट एक सबअ‍ॅटोमिक पार्टिकल लेप्टन रिलिज करते, भूक आणि वजन दोन्ही रेग्युलेट करते.

5000 लोकांवर संशोधन
मागील वर्षी एक्सपर्ट इन चायनामध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये सुद्धा दावा करण्यात आला होता की,
मोठ्या मांड्या असलेल्या लोकांमध्ये हृदयाशी संबंधीत आजारांचा धोका कमी असतो.
कमजोर मांड्या असलेल्यांच्या तुलनेत मोठ्या मांड्या असेल्यांमध्ये ब्लड प्रेशरसंबंधी (Blood Pressure) समसस्या सुद्धा कमी दिसून आल्या होत्या.
हे संशोधन अशा 5000 लोकांवर आधारित होते जे ओव्हरवेट किंवा लठ्ठपणाचा सामना करत होते.

 

संशोधनात समोर आले रहस्य
या स्टडीमध्ये संशोधकांना आढळले की, जास्त वजन असलेले पुरुष आणि महिलांच्या मांड्या अनुक्रम 55 सेंटीमीटर आणि 54 सेंटीमीटरपेक्षा जास्त होत्या,
त्यांची प्रेशर लेव्हल लो होती. हाय ब्लड प्रेशर हार्ट डिसिज (blood pressure heart disease), स्ट्रोक,
किडनी डिसिज (kidney disease) आणि हार्ट फेलियरचे (heart failure) मुख्य कारण असते.
संशोधनाचे लेखक डॉ. झेन यांग यांचा दावा आहे की पोटाच्या चरबीच्या उलट मांड्यांमध्ये जमा फॅट मेटाबलिज्मसाठी लाभदायक असते. (Thick Thighs-Round Buttocks)

 

Web Title :- Thick Thighs-Round Buttocks | thick thighs and peachy bum could increase your life says doctor

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Crime | प्रियकराच्या नादात विवाहीतेनं स्वतःच्या हाताने भरल्या संसाराचा केला ‘सत्यानाश’, तरूणासाठी पतीला दिला ‘दगा’ अन्…

WCL Recruitment 2021 | वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे ‘या’ जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

LIC Recruitment 2021 | एलआयसीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; विमा सल्लागार पदासाठी मागवले अर्ज