जाडेपणामुळे पोट कडक होणे ठरू शकते घातक

पोलीसनामा ऑनलाईन – वाढलेल्या वजनामुळे पोट बाहेर येते. परंतु, हे पोट जर कडक वाटत असेल तर ते चांगले नाही. हे वजन वाढण्यापेक्षाही अधिक घातक ठरु शकते. हार्ट आणि डायबिटीजसह हाय कोलेस्टॉलने तुम्ही पीडित असल्याचे हे संकेत असू शकतात. हार्ड बेली फॅट स्मोकिंग आणि हाय कोलेस्टॉलपेक्षाही घातक समजले जाते. यापासून बचावासाठी काही उपायही आहेत. हे उपाय केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

शरीरात विसेरल म्हणजेच हार्ड फॅट अधिक असेल तर पोट कडक होते. विसेरल फॅट पोटाच्या मध्यभागी रिकाम्या जागेत असते आणि हे फारच कडक असते. कडक फॅट पोटाच्या भींतीला बाहेरच्या बाजूने ढकलते. यामुळे पोट फार कडक होते. विसेरल फॅटमुळेच पोट जास्त कडक जाणवते. विसेरल फॅट तयार होण्यामागे आनुवांशिक कारण असू शकते. हे जिन्स कंबरेशी संबंधित असतात. शरीरात किती विसेरल फॅट आहे हे यावरून ठरते. महिलांना पोटावरील चरबीमुळे वेगवेगळे आजार होण्याचा धोका अधिक असतो. पण पुरुषांमध्ये विसेरल फॅटमुळे आजार विकसित होण्याचा धोका अधिक वाढतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, गतिहिन जीवनशैली यामुळेही कडक पोटाची समस्या उद्भवते.

पुरुषांमध्ये गतिहीन जीवनशैलीमुळे विसेरल फॅट अधिक जमा होते. तर महिलांमध्ये सबक्यूटेनियस फॅट जमा होते. पण मेनोपॉजनंतर त्यांच्यातही विसेरस फॅट अधिक जमा होते. बदलत्या लाइफस्टाइमुळे अनेकांच्या हेल्दी खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे पचनास अवघडऱ्या पदार्थांचे सेवन वाढले आहे. चरबीयुक्त पदार्थ, साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळल्यास ही समस्या दूर करता येईल.