home page top 1

पैशांनी भरलेली बॅग चोरट्याने पळवली ; दोन ‘बहाद्दरां’नी केला प्रतिकार आणि घडले असे काही

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – वृध्द शिक्षिकेने बँकेतून लाखो रुपये काढुन बॅंकेतून घरी परतत असताना चोरट्याने बॅग हिसकावून लंपास केली. तरुणाने मोठ्या धैर्याने त्याला पकडून ठेेवले पोलीसांच्या स्वाधीन केले.

सविस्तर माहिती की, आज बुधवारी दुपारी बारा वाजेदरम्यान दत्तमंदिर चौकातील युनियन बँकेतील शाखेत विमलबाई शालीग्राम पाटील वय. 60 रा. श्री स्वामिनारायण मंदिर रोड, दत्त कॉलनीतील ज्येष्ठ नागरीक शिक्षिका वैद्यकीय उपचारासाठी लागणारा खर्च काढण्यासाठी गेल्या. त्यांनी बँकेतून कापडी पिवशीत रोख तीन लाख रुपये, एक मोबाईल, बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड ठेऊन घरी पायी दत्त कॉलनीत परत जात असताना पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या चोरट्याने त्यांना पाठीवर जोरात थाप मारली. हातातील पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी हिसका देत ओढली. यात महिलेच्या हातीतील बागंडी फुटून हाताला जखम झाली. त्यातून रक्त वाहत होते. पिशवी चोरुन नेली असता महिलेने आरडाओरड केली. एवढ्यात तिथून जात असलेल्या एका तरुणाने पाहत चोरट्याचा पाठलाग केला आणि चोरट्याला पकडले. चोरट्याने तरुणाला धमकावले, बंदुकीचा धाक दाखविला. परंतु तरुणाने चोरट्याला सोडले नाही. काही वेळाने देवपूर पोलीस तिथे आले. चोरट्याला पकडुन पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

नेहमी आपण अपघात किंवा चोरीच्या घटना डोळ्यादेखत पाहतो परंतू मदतीचा हात देण्यास घाबरतो. लोक फक्त घटनाक्रम मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतात. मदतीला धाव घेत नाही. परंतू वैभव कोळी, हिरामण गवळी दोघांनी मोठे धैर्य दाखवत सराईत चोरटा सुनिल मालचे याला पकडुन पोलीसांच्या स्वाधिन केले. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली.

वैभव कोळी, हिरामण गवळी दोघा तरुणांचा देवपूर पोलीस ठाण्यात मोठ्या धैर्याने सराईत चोरट्याला गजाआड करण्यात मदत केली म्हणुन पुष्पगुच्छ देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पो.नि.सानप यांनी कौतूक केले.

 

Loading...
You might also like