धुळे : सराफ दुकानात चोरी, ५२ लाखांचा ऐवज लंपास

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे तालुक्यातील थाळनेर गावात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून दुकानातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी दोन्ही दुकानातून तब्बल ५२ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

धुळे तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविवारी रात्री होळनांथे गावातील चौकात असलेल्या भालेराव ज्वेलर्सचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले. ज्वेलर्सचे मालक बाळकृष्ण महादू भालेराव (वय – ६०) हे आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी दुकानातील १०० ग्रँम सोने, ४ किलो चांदी असा ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

या ठिकाणी चोरी केल्यानंतर काही अंतरावर असलेले गणेश ज्वेलर्स हे दुकान चोरट्यांनी फोडले. या दुकानातून चोरट्यांनी दुकानातील सोन्याचे दागिने, हार असा अंदाजे ४६ लाख ५ हजार ५१८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती मालक किरण सोनार यांनी माहिती थाळनेर पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान चौकातील मुख्य रस्त्यावर घुटमळले. घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या