बावधन मध्ये साडे चार लाखाची घरफोडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बावधन येथे बेडरूमच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी बंगल्यातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला. ही घटना बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणी श्रीकांत मुकुंदराव भट (३६, रा. उत्तमनगर, बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हे शनिवारी कामानिमित्त परगावी गेले होते. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. लाकडी कपाटाचे ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण चार लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास श्रीकांत घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like